अमळनेर ( लोक न्यूज ) 
 अमळनेर येथील गांधलीपुरा परिसरातील नगरपरिषद दवाखाना समोरील व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळाच्या मागील भागात कुंटणखाने सर्रासपणे सुरू आहे हे तात्काळ बंद करण्यात यावे असे निवेदन पोलिस निरीक्षक श्री जयपाल हिरे यांना देण्यात आले.
         शहरातील सामाजिक कार्यकर्ते अमजद अली शाह, सैय्यद कुदरत अली, इकबाल कुरैशी यांच्या वतीने देण्यात आलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की शहरातील गांधलीपुरा भागातील नगरपरिषद दवाखाना समोरील व डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळाच्या मागील भागात कुंटणखाने  वेश्याव्यवसाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे सदरील कुंटणखाने बंद होणे बाबत मा.हायकोर्ट औरंगाबाद येथे क्रिमीनल रिट पिटीशन नं.५९८ / २०१९ दाखल आहे  में कोर्टाचे बंद होणे बाबत निर्देश असुन सुद्धा में कोर्टाच्या आदेशच्या अवमान करून त्याला न जुमावता सदर व्यवसाय राजरोसपणे खुलेआम शहरांमध्ये चालु आहे तसेच सदरील भागात सी सी टी व्ही ही सुद्धा बसविण्यात आले होते परंतु ते देखील तोडून टाकले आहे वरील व्यवसाय बंद होणे बाबत दिनांक १८/१/२०२० रोजी मा जिल्हा पोलिस अधीक्षक साहेब यांना समक्ष भेटून अर्ज दिलेला आहे तरि या बाबतीत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही म्हणून आपणास व्यवसाय बंद होणे साठी नम्र विनंती करीत आहोत