लोक न्यूज :- महेंद्र गुरव,तळोदा


राज्यातून आताच  कुठे  कोरोनाचा  प्रभाव   काहीसा प्रमाणात मंदावला असतांना येणाऱ्या 10 सप्टेंबर 2021 रोजी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता शासनाचा नियमांचे  पालन करून देशभरात अगदी आनंदात श्री गणेशाचे आगमन  होऊन स्थापना होईल.
   तळोदया शहरातील शनीगल्ली येथील भगवती       आर्ट चे   प्रो.भटू हरीलाल बुनकर,  भूषण बुनकर (परदेशी) यांचा सोबत  दीपक  सुरेश गुरव  यांनी गेल्या 8 वर्षापासून नवनवीन गणेशमुर्ती बनविणे या व्यवसायाची  सुरवात केली आहे. भगवती आर्ट यांचा कडे गणेशमुर्ती, महालक्ष्मी, साईबाबा, छत्रपती शिवाजी महाराज, अश्या अनेक प्रकारची मुर्ती तैय्यार करून मिळत   असतात.
     भगवती आर्टचे  प्रो.भटू  बुनकर, दीपक गुरव सोबत कपिल गुरव यांनी यंदाचा वर्षाकरिता गेल्या 3 ते 4 महिन्यापासून अहोरात्र मेहनत  करून गणेशमुर्ती बनविण्याचे काम रात्री 2 वाजेपर्यंत करीत असून लालबाग, पुणे पॅटर्न, दगडूशेठ हलवाई, अलंकारी, महाराजा, जिराफे पॅटन, सोनसरे, मालवण अश्या अनेक प्रकारचा पॅटन असलेले 9 इंच पासून तर 2 फुटा पर्यंत तब्बल 400 गणेश मुर्त्यांची कामे आता पूर्णत्वात आली आहेत. व बुकिंग देखील  सुरु आहे. त्याचा साधारण 400 रू पासून 1100 रु पर्यंतचा दर आहे.
      भगवती आर्ट यांचा अप्रतिम व देखण्या कलाकृतीच्या गणेशमुर्तीला तळोदा तालुक्यासह धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, तसेच  राज्याबाहेर गुजरात, व मध्यप्रदेश राज्यातून  देखील मागणी मिळत  आहे.   प्रो भटू बुनकर mo :- 9822844582.  दीपक गुरव :-7517089131 या मोबाईल no वर संपर्क करून व्हॉट्सपवर फोटो मागवुन व आपल्या आवडीची गणेशमूर्ती बुकिंग करीत आहेत.व काही ग्राहक प्रत्यक्ष भेट देऊन बुकिंग करीत आहेत.

विचाले असता त्याने आमचा कडील  गणेशमूर्ती ही पूर्णपणे शाळूमाती, व   
लालमातीची भरीव गणेशमुर्ती असून पाण्यात तळाशी जाऊन 24 तासाचा आत पूर्ण पणे विसर्जित होते. विटंबना देखील होत नाही. गणेशमुर्ती वर होणारे रंगकाम
एकऱ्यालिक (वॉटरबेस )चे रंगकाम केले जाते.  . . व मूर्ती वरील रंगापासून नदी, नाले , तलाव, विहीर अश्या कुठल्याही पाण्यात विसर्जन केले असता  पाणी देखील दूषित होत नाही. म्हणजेच पर्यावरणाबाबत योग्य विचार भगवती आर्ट यांनी केल्याचे  समजते.... म्हणूनच कदाचित आमचा गणेशमुर्तीला या वर्षी इतर भागातून जास्तीची मागणी मिळत असावी असे भगवती आर्ट चे प्रो. भटू बुनकर, व दीपक गुरव यांनी आपले मत व्यक्त केले.
व श्री गणेशाचीमुर्ती हवी असल्यास 9822844582, 7517089131 या no वर संपर्क करावा. भगवती आर्ट शनी गल्ली ता,तळोदा जि नंदुरबार..