लोक न्यूज-
अमळनेर : जुने बिल काढण्यासाठी अडीच लाखाची लाच मागणाऱ्या दोन्ही अभियंत्यांना अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
उपविभागीय अभियंता दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजित गांधलीकर यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांना ७ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील ऍड शशिकांत पाटील यांनी युक्तिवाद केला. आरोपींचे सनदशीर मार्गाने किती उत्पन्न आहे आणि संपत्ती किती आहे, आरोपींचे बँक खाते तपासायचे आहे, लॉकर तपासायचे आहे या कारणावरून त्यांना पोलीस कोठडीची मागणी केली.
न्या. व्ही. आर. जोशी यांनी दोन्ही आरोपीना पाच दिवसांची कोठडी सुनावली.