जळगांव (लोक न्यूज)

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.  डॉ. संजय कुटे, जामोद जळगाव, आशिष शेलार वांद्रे पश्चिम, अभिमन्यू पवार, औसा, लातूर. गिरीश महाजन, जामनेर, जळगाव. अतुल भातखळकर, कांदिवली पूर्व, मुंबई, पराग अळवणी, विलेपार्ले, मुंबई. हरिश पिंपळे, मूर्तिजापूर, अकोला. राम सातपुते, माळशिरस, सोलापूर. योगेश सागर, चारकोप, मुंबई, नारायण कुचे, बदनापूर, जालना. कीर्तिकुमार भांगडिया, चिमूर, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात जोरदार राडा पाहायला मिळाला. सत्ताधारी आणि भाजप आमदारांमध्ये धक्काबुक्की झाली इतकंच नाही तर तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनाही

धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर भास्कर जाधव यांनी आपलं मत सभागृहात मांडलं. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव बह मतान म जळूरही करण्यात अालाय.

भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणाचा ठराव मतांसाठी मांडताना भाजप आमदार आक्रमक झाले. भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरुन विधानसभाध्यक्षांच्या माईकला हात लावला. संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि हा ठराव आवाजी बहुमतानं मंजूरही करण्यात आलाय. भाजपच्या १२ आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. याबाबत तालिका अध्यक्षांच्य दालनात धक्काबुक्की झाली नसल्याचे स्पष्टीकरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.