भाऊ बहिणीच्या नात्याला पालवी फोडत मनोरुग्णांनी साजरा केला सण
चोपडा- साधारण दिड वर्षापूर्वी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेले या गाव परीसरात रस्त्यावर फिरणार्या बेवारस मनोरुग्णांकरीता अमर संस्थेमार्फत "मानव सेवा तिर्थ"हे केंद्र सुरु करण्यात आले.रस्त्यावर बेवारस फिरणार्या मनोरुग्णांवर येथे उपचार करुन त्यांना योग्य जिवनप्रवाहात आणण्याचे काम मानव सेवा तीर्थ करते.या मनोरुग्णांना येथे प्रभु या नावाने संबोधले जाते,याठिकाणी त्यांची अतिशय आपुलकीने काळजी घेतली जाते व हे जवाबदारीचे कार्य व्यवस्थापक नरेंद्र रावण पाटिल व त्यांचे सहकारी अतिशय योग्यरित्या पार पाडतात.आतापर्यंत एकूण 98 मनोरुग्णांना त्यांनी व्यवस्थित करुन त्यांच्या घरी सोडले आहे.व आज रोजी मानव सेवा तिर्थ येथे 50 मनोरुग्ण आहेत.
मानव सेवा तीर्थ,वेले येथील बेवारस मनोरुग्णांनी "रक्षाबंधन"हा सण साजरा करून भाऊ बहीण असे पवित्र नाते जपले आहे.
अमर संस्थेने अश्या बेवारस मनोरुग्णांना हक्काचे घर दिले आहे आणी त्यात कुटुंबासारखी राहणारी ही मनोरुग्ण आपसात भाऊ-बहीण याप्रमाणे वावरतात.त्यांना ह्या प्रेमाची जाणीव देणारा सण म्हणजे"रक्षाबंधन"तो साजरा करतांना सर्वच प्रभुजी मनस्वी आनंदले होते.
अमर संस्थेचे चेअरमन चंद्रकांत पाटील व संचालक मंडळ यांनी सर्व मनोरुग्णांना या दिवशी शुभेच्छा दिल्यात.