कनगाई फत्तेपूर (शिरपूर)
संपूर्ण भारतात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात कोरोना चा प्रादुर्भाव असल्यामुळे सर्व आश्रम शाळा महाविद्यालये कॉलेज संस्था बंद आहेत त्यामुळे आदिवासी खेडेगावातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणीक नुकसान होत आहे.
शासनाने ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू केली पण आदिवासी भागात एक वेळचे जेवणाचा प्रश्नअसतो. मुलांना ऑनलाईन शिक्षण कुठून मिळणार पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी विद्यार्थी शेतात मजुरी करायला जातात मग ते शिक्षण कसे करणार ऑनलाईन शिक्षण साठी स्मार्ट फोन टीव्ही यांची गरज असते ज्यांच्याकडे टीव्ही आहे पण वीज लाईट वेळेवर राहत नाही.
. या सर्व समस्या विचारात घेऊन शिरपूर तालुक्यातील कनगाई या छोट्याश्या खेडे गावतील तरुण चुनिलाल पावरा यांनी आपला १ जुलै वाढदिवस जन्मदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा विचार केला कनगाई गावात जे विध्यार्थी शिक्षण पासून वंचित राहत आहेत त्यांचे मोफत क्लास ट्युशन शिकवणी सुरु केली आहे त्याचा खूप मोठा फायदा गरीब आदिवासी मुलांना होत आहेत १ ली ते १० वी पर्यंत मुलांना चे ऑनलाईन शिक्षण चूनिलाल पावरा स्मार्ट फोन मोबाईल चा वापर करून तसेच जे पुस्तके उपलब्ध आहेत त्यातून मुलांना शिक्षण देत आहे.
क्लास ट्युशन १ जुलै २०२० पासून सुरु केले सुरुवातीला क्लास सुरू केले तेव्हा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कोरोना विषाणू चा कहर सर्व ठिकाणी असल्यामुळे सर्व मुलांना मास्क हँड वॉश वाटप केले. कारोना विषाणू संदर्भात माहिती देऊन सोशल डीसटॅन्स चा विचार करून त्या नुसार सर्व नियम विचारत घेऊन क्लास ट्युशन सुरू केले.
चुनीलाल पावरा म्हणाले की....
माझ्या या उपक्रमाला गावातून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे माझे सहकारी मित्र ते पण मला मदतीला आले आहेत सुनील पावरा मोतीलाल पावरा वेळोवेळी मदत करत असतात
हा उपक्रम सुरू करून खूप आनंद होत आहे की मी माझ्या येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल करण्याचा छोटासा प्रयत्न करून हातभार लावला.
मोफत क्लास ट्युशन सुरू केले त्यामुळे सर्वात मोठी आर्थिक समस्या आली पण मित्रांना हा उपक्रम सांगितला मित्रांनी मला लगेच आर्थिक मदत केली आणि हा उपक्रम सुरु केला... जो पर्यंत शाळा महाविद्यालये सुरू होत नाही तो पर्यंत माझा हा उपक्रम सुरूच राहील...