अमळनेर(रिपोर्ट): कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणुन आता तालुकाभरातील प्राथमिक आरोग्यकेंद्राच्या ठिकाणी आणि गावपातळीवर शिबीरे (कॅम्प) आयोजीत करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी सांगीतले.येथील आय.एम.ए.हॉल येथे  तालुकाभरातील खाजगी-सरकारी डॉक्टरांसोबत एक व्यापक सभा घेण्यात आली.त्या सभेला मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी बोलत होत्या.याप्रसंगी तालुकाभरातील डॉक्टरांसह पालीका मुख्याधीकारी विद्या गायकवाड,नोडल अधीकारी डॉ प्रकाश ताडे,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ गोसावी, आदी मान्यवर व्यासपिठावर होते.
गावा-गांवातील अन्य आजाराचे लक्षण असलेल्यांनी कोवीड चाचणी जास्तीत-जास्त नागरीकांनी करून घ्यावी,पॉझीटीव्ह रूग्णांवर लागलीच आवश्यक उपचार सुरू करण्यात येतील,त्यासाठी कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही असेही आवाहन प्रांत यांनी केले.गावातील सरपंच,पोलीस पाटील आदी पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेऊन त्यांचेही सहकार्य घेण्यात येईल,त्यासाठी त्या त्या ठिकाणी प्रशासनाकडुन विवीध उपाय-योजनांची अंमलबजावणी आणी साहीत्य पुरविण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.प्रांताधिकाऱ्यांसह तालुका वैद्यकीय अधिकारी  आदींनिही आयोजीत सभेला तालुक्यातील शिबीरांविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.