चोपडा (रिपोर्ट) - येथील गणेश बेहेरे मित्र मंडळाच्या वतीने बोरोले नगर दोन, बोरोले नगर 3 , शारदा नगर , मधुबन नगर, गुरुकुल नगर या कॉलनी परिसरातील नागरिकांची थर्मल मीटर व पल्स ऑक्सी मीटरच्या साह्याने प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यावेळी तालुक्याचे तहसीलदार अनिल गावित यांनी शहरातील प्रत्येक कॉलनीत स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था व स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रमघेणार असल्याचे सांगितले .त्यावेळी त्यांनी कॉलनीत जर सस्पेक्टेड पेशंट आढळले तर कॅम्प सुद्धा घेऊ असे सांगितले तसेच चोपडा शहर व तालुक्यातील त्यांनी मेडिकल टीमचे कौतुक केले सध्या खबरदारी व काळजी घेणे तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करणे व नागरिकांनी सत्य माहिती डॉक्टरांना व प्रशासनास देणे इत्यादी गोष्टी या उपक्रमाद्वारे व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. थर्मल व पल्स मिटर च्या साह्याने बऱ्याच गोष्टी समोर येतात आणि या सर्व गोष्टींचा डाटा अपडेट ठेवावा व प्रशासनाच्या मदतीने लोकांना सहकार्य करण्यात येईल तसेच चोपडा शहर व तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेशंटची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे जून महिन्यात फक्त 42 पेशंट होते आणि आत्ता तो आकडा एक हजाराच्या वर गेला आहे पेशंट वाढण्याची त्यांनी दोन कारणे सांगितली त्यात काही लोकांमध्ये बिनधास्तपना दिसून येतो 'दूसरे - काम नसताना लोक रस्त्यावर गर्दी करतात व बाहेर निघतात. जर या गोष्टी टाळल्या तर कोरोना वर आपण मात करू शकतो .आता यापुढे पीएससी सेंटरवर सुद्धा टेस्टिंग सुरू करण्यात आले आहेत. पेशंटची लगेच तपासणी करून उपचारासाठी ऍडमिट करून घेतले जातात तसेच अनेक उपायसुद्धा शासन-प्रशासन राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप लासुरकर यांनी SMS पद्धतीवर भर देण्यास सांगितले त्यात एस म्हणजे सोशल डिस्टन्स , M म्हणजे मास्क, तिसरा S म्हणजे सॅनिटायझर तसेच सामाजिक कार्यकर्ते एस बी पाटील यांनी कोरोना हा सहज घेण्यासारखा आजार अजिबात नाही व तसेच खूप घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले तसेच खबरदारी हा रामबाण उपाय असल्याचे म्हटले. यावेळी बोरोले नगर 2 , बोरोले नगर 3 , शारदानगर मधुबन नगर गुरूकुल नगर या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व उपस्थित नागरिकांपैकी काही नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी डॉ प्रदीप लासूरकर ,डॉ संजय जाधव, डॉ ललित चौधरी ,डॉ सुनील पाटील यांनी यावेळी प्रमुख अतिथी म्हणून तालुक्याच्या तहसीलदार अनिल गावित ,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ प्रदीप लासुरकर , तसेच वैद्यकीय उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते एस बी पाटील डॉ संजय जाधव, डॉ ललित चौधरी ,डॉ सुनील पाटील यासह गणेश मित्र मंडळाचे प्रदीप पाटील, योगेश महाजन ,महेंद्र सोनवणे ,नाना सुर्यवंशी समाधान सोनवणे राहुल भाट प्रविण कोळी दिनेश चौधरी राजेंद्र पारे, सूर्यकांत जाधव ,,रामदास जाधव,, संजय सैंदाणे , प्रशांत गोड ,आर डी पाटील संदीप ओली, मिलींद सोनवणे ,नारायण साळुंखे, मोरे सर, शुभम माळी यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.