एकतास येथील रेशन दुकान कोणतेही शासनाचे फलक नाही?



लोक न्यूज(रिपोर्ट)

अमळनेर तालुक्यातील एकतास येथील रहिवासी व बी.पी.एल. कार्ड धारक शंकर विठ्ठल नाथबुवा हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर गावाला भंगार जमा करण्याचा व्यवसाय करतात, एकतास या गावाला शासनाचे मोफत आलेले रेशन घेण्यासाठी त्यांच्या मुलीला पाठवले होते, परंतु रेशन दुकानदाराने मनमानी करत उडवाउडवीची उत्तरे दिली,5 ऑगस्ट पर्यंतच मुदत होती.मुदत संपली तुम्हाला रेशन मिळणार नाही. या दुकानदाराने नाथबुवा परिवाराचे मोफत आलेले रेशन काळ्या बाजरात दिले की काय? दक्षता समितीचा अध्यक्ष रेशन दुकानदाराचा जवळीकच आहे असे समजते,म्हणून तक्रार कोणाकडे करावी?
"चित भी मेरी बट भी मेरी"

असे लोक न्युजशी बोलतांना त्या मुलीने सांगितले आहे, काही गावकऱ्यांनी सुद्धा लोक न्यूज जवळ आपले गऱ्हाणे मांडले आहेत,तीन महिन्यांच्या मोफत रेशनिंग वाटप दरम्यान आम्हाला फक्त एक किलो दाळ मिळाली आहे.आमच्या कडून दहा रुपये हमाली वाहतूक भाड्याच्या नावाने सुद्धा घेतले जातात.
अशा या मनमानी करणाऱ्या रेशन दुकानदारावर शासनाने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी जोरधरत आहे.



"या दुकानाचा गरीब जनतेचा उर्वरित गहू तांदूळ स्टोरेज होतो तरी कुठे?"



शासनाच्या नियमानुसार........
रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर शासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे.