अमळनेर(रिपोर्ट)
महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय वनश्री पुरस्कार प्राप्त निसर्ग-मित्र समिती-व हरवलेली पाखरं गृप पिळोदे  तालुका अमळनेर  यांच्या संयुक्त विद्यमाने पिळोदे येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला
यावेळी ,
निसर्ग-मित्र समिती चे संस्थापक-प्रेमकुमार अहिरे अध्यक्षस्थानी होते,तर  निसर्ग-मित्र समिती चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष     सबगव्हाणचे सरपंच नरेंद्र पाटील,जिल्हा संपर्क-प्रमुख विजय-वाघ सर,शिंदखेडा तालुका अध्यक्ष आर आर सोनवणे सर,चोपडा तालुका संपर्क-प्रमुख विश्राम तेले,चोपडा तालुका संघटक कांतीलाल पाटील सर आदी मान्यवरांसह ग्रामस्थ व पिळोदे चे युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित हेते,या वेळी  सोशल डिस्टींगसिलचे पालन करून गावातील प्रमुख चौकात 
७ते ८ फुटाचे विविध प्रकारचे वृक्षांचे  लागवड  करण्यात आली,
सदर कार्यक्रमात तालुकाध्यक्ष म्हणून भुषण पवार सर यांची नियुक्ती करण्यात आलीव आमोल  कोळी यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला नियोजन अमळनेर तालुकाध्यक्ष भूषण पवार सर,उदय पाटील-सर हेमंत पवार नितीन पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.