भुसावळ (रिपोर्ट )- 
येथील पालिकेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी ८ जुलै रोजी मुख्याधिकारी पदभार स्वीकारला मात्र कोणतीही सुट्टी न टाकता त्यावेळेस पासून ते हजरच  झाले नाहीत .  त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून प्रभारी पदभार चोपडा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
   येथील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांना कोरोनाकाळामध्ये अपेक्षित काम न केल्यामुळे काही दिवसासाठी सक्तीच्या सुटीवर पाठवण्यात आले होते. त्या काळात त्यांची बदली झाली. त्यामुळे पालिकेच्या मुख्याधिकारीपदी रमाकांत डाके यांची नगर विकास विभागाने ७ जुलै रोजी बदली केली. डाके यांनी दुसर्‍याच दिवशी ८ जुलै रोजी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. यामुळे पालिकेची कामे सुरळीत होतील अशी आशा होती.
शहरातील बकाल परिस्थितीत मुख्याधिकारी मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र मुख्याधिकारी डाके यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शासनाकडे ना सुट्टी टाकली, मंजुरी घेतली व पहिल्या दिवसापासूनच ते बेपत्ता झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अभिजित राऊत त्यांनी नोटीस काढून आपण कर्तव्यात कसूर केली असल्यामुळे १९७९ मधील कलमानुसार कारवाई का करण्यात येऊ नये, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. नोटीस मिळाल्यानंतर तीन दिवसाचे आत खुलासा सादर करावा तीन दिवसात उत्तर न दिल्यास कार्यवाही करण्यात येईल असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
चोपडा मुख्याकार्‍यांकडे पदभार
२४ रोजी चोपडा येथील मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांना भुसावळ नगरपालिकेचा प्रभारी व अतिरिक्त पदभार देण्यात येत असल्याचे आदेश दिले आहे.