भुसावळ (रिपोर्ट )- 
कोरोनाचे कठीन परिस्थितीत विविध मार्गाने अहोरात्र जनसेवा करणाऱ्यां कोरोना योद्धाचा 
'कोरोना कर्मवीर '  म्हणून येथील
इनरव्हील क्लब अॉफ भुसावळ तर्फे सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले . 
     कोरोनाच्या भयंकर   परिस्थिति तन ,मन धनासह अहोरात्र  सेवा व कार्य करणारे तसेच अन्न दान करणाऱ्यां दानशूर  कोरोना योद्धाचा 'कोरोना कर्मवीर   म्हणून गौरव करण्यात आला . 
     शहरातील  भिरुड हॉस्पिटल समोरील प्राची बंगला येथे सोमवार २७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात सोशल डिस्टनसिंगसह शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करण्यात येवून कार्यक्रम संपन्न झाला  . 
सत्कारार्थीमध्ये निर्मल उर्फ पिंटू कोठारी ,  नगरपालिकेच्या डॉ कीर्ति फलटणकर ,  डॉ संदीप जैन , डॉ शीतल ढाके  (गोदावरी हॉस्पिटल मधील  कोवीड १९ ICUविभाग ) अॅड.  बोधराज चौधरी , २००० वृक्षारोपण करणारे  प्रमोद शुक्ला ,तसेच  रेल्वे  हॉस्पिटल मधील  आइसोलेशन वॉर्ड मधील १० नर्सेस यांचा  वृक्षरोप , सन्मानपत्र व भेटवस्तू देवून सन्मान  करण्यात आला .सन्मानपत्राचे वाचन अध्यक्षा शितल भराडे यांनी केले . 
    यावेळी  प्रमुख पाहुणे म्हणून राधेश्याम लाहोटी होते तर
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी
प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा तसेच इनरव्हील क्लब भुसावळ च्या पास्ट प्रेसिडेंट सौ  रजनी सावकारे उपस्थित होत्या .आयोजक यांनी गर्दि टाळून आयोजित कार्यक्रमात काही सत्कार संपन्न केले तर काही सत्कारार्थीचे सत्कार घरी जाऊन केले . 
कार्यक्रमास बी ए लाहोटी चैरिटेबल ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले . कार्यक्रमास प्रेसिडेंट शितल भराडे ,सेक्रेटरी रूचीका शर्मा, ट्रेजरर कंचन जोशी,रजनी सावकारे , पास्ट प्रेसिडेंट आरती चौधरी यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. 
शीतल भराडे इनरव्हील क्लब् अध्यक्षा यांनी यावेळी सांगितले की, यापुढे देखील  इनरव्हील क्लब् तर्फे नेहमी  समाजोपयोगी कार्य करत राहू , आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्यांचा सुद्धा सन्मान करत राहू असे क्लबच्यावतीने  जाहिर करुन आभार व्यक्त केले . 
  दरम्यान इनरव्हील क्लब तर्फे जामनेर रोड वरील दुभाजका मध्ये मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .