संपूर्ण जगाबरोबरच भारत देशात व महाराष्ट्र राज्यात कोरोना विषाणू रोगाने थैमान घातले असून सातारा जिल्ह्यात देखील याची लागण झालेले रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या सातारा शहर आणि जिल्हा कार्यकारणीकडून सातारा जिल्ह्यात 7 रुग्णवाहिका जिल्हा प्रशासनास सहकार्य म्हणून विनामूल्य सेवेसाठी देत आहोत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष प्रविण कांबळे यांनी दिली.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, जिल्हाध्यक्ष इ. मीडिया विकास भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इ. मीडिया चंद्रकांत पवार, जिल्हा सचिव सचिन बर्गे, सातारा शहराध्यक्ष प्रकाश शिंदे, शहर कार्याध्यक्ष तबरेज बागवान, सातारा शहर सचिव मंगेश कुंभार, शहर सहसचिव वैभव बोडके तसेच सातारा तालुका सदस्य राहुल ताटे-पाटील व अन्य पत्रकारांच्या वतीने सदरचे पत्र सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आले.
तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजयजी भोकरे सर व प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्यसरचिटणीस विश्वासराव आरोटे व सातारा जिल्हा कार्यकारणी मार्गदर्शक मधुसूदन पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा कार्यकारिणीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना हे पत्र देण्यात आले