लोक न्यूज
अमळनेर येथे सी.आर. पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये २०२५–२६ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक क्रीडा महोत्सव दि. ८ डिसेंबर रोजी उत्साहात व आकर्षक वातावरणात पार पडला. सकाळी आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस इन्स्पेक्टर दत्तात्रेय निकम उपस्थित होते. त्यांच्या हस्ते मशाल प्रज्वलन करून क्रीडा महोत्सवाचा भव्य शुभारंभ करण्यात आला.
उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आकर्षक मार्च-पास्ट परेडने उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. विविध हाउसेसने केलेली शिस्तबद्ध पथसंचलन स्पर्धा उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होती. यानंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थिनींनी पारंपारिक लेझीम नृत्याचे सादरीकरण करून संपूर्ण प्रांगण दुमदुमवून टाकले. लेझीमच्या तालावर प्रांगणात उत्साह आणि आनंदाची लहर निर्माण झाली.
दिवसभर विविध स्पर्धात्मक खेळांचे रंगतदार सामने विद्यार्थ्यांनी सादर केले. धावणे, लांब उडी, गोळाफेक, रिलेमॅच, तसेच अन्य गट आणि वैयक्तिक प्रकारातील खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्तम कौशल्य आणि खेळाडूवृत्ती दाखवली. स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना आणि उत्साह यांचा अप्रतिम मिलाफ पाहायला मिळाला.
शाळेचे संस्थापक श्री. महेश पाटील सर, मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील, तसेच उपमुख्याध्यापिका सौ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण क्रीडा महोत्सवाचे नियोजन आणि आयोजन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन अनिता पाटील यांनी उत्तम रीतीने पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये शाळेच्या क्रीडा विभागासह सर्व शिक्षकवर्गाने अत्यंत समन्वय आणि जबाबदारीने सहभाग नोंदवला. मुख्याध्यापिका सौ. नूतन महेश पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाला मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना खेळांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त आणि आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
मुख्याध्यापिकांच्या नेतृत्वाखाली पार पडलेला हा वार्षिक क्रीडा महोत्सव अत्यंत शिस्तबद्ध, उत्साही आणि संस्मरणीय ठरला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, पालकांची उपस्थिती आणि शिक्षकांचे समर्पित योगदान यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.