लोक न्यूज
अमळनेर येथील साने गुरुजी नूतन माध्यमिक विद्यालयात, मुलांना मैदानावर नेऊन आनंददायी व सोप्या पद्धतीने गणित समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रत्यक्ष इमारतीच्या सावलीने व सूर्याच्या प्रकाशाने वर्तुळासंबंधी संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे कृतीयुक्त अध्यापनाने गणित शिक्षक डी. ए. धनगर यांनी संस्था सचिव संदीप घोरपडे व मुख्याध्यापक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाने समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनी आनंदाने त्या समजून घेतल्या.
सर्वसाधारणपणे गणित विषयातील संकल्पना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही. अमूर्त स्वरूपात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिताचा अभ्यास करताना न्यूनगंड येतो असा आरोप होतो. त्या संकल्पना मूर्त स्वरूपात अर्थात प्रत्यक्ष दिसण्याच्या स्वरूपात मांडल्या तर त्या विद्यार्थ्यांना लवकर समजतात याचा विचार करून श्री धनगर यांनी हा उपक्रम राबवला. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मैदानावर नेण्यात आले. नैसर्गिक साधन संपत्तीचा उपयोग करून संकल्पना सांगण्यात आल्या. त्याकरिता सूर्याच्या प्रकाशाचा व इमारतीचा सावलीचा खूबीने सुयोग्य वापर करून जीवा ही संकल्पना प्रत्यक्ष मुलांना दाखवली. तत्पूर्वी विद्यार्थ्यांना एका खांबाच्या भोवती वर्तुळाकार बसवण्यात आले. वर्तुळाच्या ज्या भागावर विद्यार्थी बसले त्याला परिघ म्हणतात. त्याचवेळी त्या भागात इमारतीची सावली आली, वर्तुळाकार भागातील इमारतीची सावली म्हणजे जीवा असते हे मुलांना लवकर लक्षात आले. उपस्थित सर्वच मुले आनंदाने बघू लागले. सावली हळूहळू पुढे सरकू लागली ती नेमकी मध्यभागी असलेल्या म्हणजे केंद्रावर असलेल्या खांबा जवळ आली, तेव्हा सांगितले की जेव्हा जीवा वर्तुळाच्या केंद्रातून जाते तेव्हा त्याला व्यास म्हणतात. व्यास ही वर्तुळातील सर्वात मोठी जीवा असते असे समजावून दिले. याच पद्धतीने दोर वापरून व प्रत्यक्ष मुलांना उभे करून त्रिज्या, जीवा, व्यास, केंद्र, परीघ, स्पर्शिका ,छेदीका, वर्तुळाचा अंतर्भाग, वर्तुळाचा बाह्य भाग, केंद्रिय कोन , लघु वर्तुळ कंस व विशाल वर्तुळ कंस इत्यादी संकल्पना दृश्य स्वरूपात समजावून देण्यात आल्या. अशाच पद्धतीने वर्तुळाला स्पर्शिका छेदिका काढून मूलांना समजावण्यात आले. विद्यार्थ्यांनी देखील खेडीमेडीच्या वातावरणामध्ये आनंददायी पद्धतीने समजावून घेतले. निसर्गात गणित सामावलेले आहे गरज आहे ते फक्त समजून घेण्याची याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी घेतली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास सकारात्मक पद्धतीने वृद्धिंगत झाला. सदर कृतीयुक्त व आनंददायी उपक्रमाचे सहभागी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष हेमकांत पाटील, सचिव संदीप घोरपडे, मुख्याध्यापक सुनील पाटील, सर्व संचालक मंडळ व पालकांनी केले. या उपक्रमाला जयेश मासरे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले. मैदानावर शिकलेल्या गणिताची मजा काही औरच होती असे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. स्वयंप्रेरणेने गणित शिकण्याचा मनमुराद आनंद लुटला.अशाया आनंददायी उपक्रमाने मूलांची मने जिंकली. व गणितातील अध्ययन निष्पत्ती साध्य झाली.