अमळनेर –लोक न्यूज
शहरातील मोबाईल विक्री-दुरुस्ती व्यापारी, अॅसेसरीज विक्रेते तसेच किरकोळ मोबाईल रिचार्ज व्यवसायिकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असलेल्या मोबाईल व्यापारी असोसिएशन, अमळनेर यांनी अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री. जितेंद्र भाऊ ठाकूर यांना जाहीर पाठींबा दिला आहे.
असोसिएशनचे संपर्क कार्यालय प्रविण कम्युनिकेशन, विजय मारोती मंदिरासमोर, अमळनेर येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरातील मोबाईल विक्रेत्यांना भेडसावणाऱ्या समस्या—
• परवाना व व्यावसायिक कराशी संबंधित अडचणी,
• बाजारपेठेतील सुरक्षेचे मुद्दे,
• रोड डेव्हलपमेंट कामांमुळे होणारा व्यवसायातील अडथळा,
• तसेच लघु उद्योजकांसाठी आवश्यक असलेली प्रशासनाकडून तत्पर सेवा
याबाबत श्री. ठाकूर यांनी चर्चा करून योग्य निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. व्यापाऱ्यांच्या मागण्या वेळेत सोडविण्यासाठी व व्यवसायास पोषक वातावरण निर्मितीसाठी शहर विकास आघाडी कटिबद्ध असल्याचा विश्वास असोसिएशनने व्यक्त केला.
मोबाईल व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती असलेल्या या बैठकीत व्यापाऱ्यांनी ठाकूर यांना शहराच्या विकासासाठी सक्षम नेतृत्व म्हणून पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले.