ठाणे(मुंबई)
कोरोना विषाणू संकटाच्या पार्श्वभूमीवर भारतात तसेच महाराष्ट्रात सर्वञ संचारबंदी कायदा लागू करण्यात आला आहे.
या कायद्या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंदे हे पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे.
अश्या परिस्थितित मुंबईतील धारावी कोळी वाडा व धारावी झोपडपट्टी वसाहत येथे तामिलनाडू चेन्नई येथून धारावी एरियात वर्षानुवर्षा पासून स्थाईक झालेले बरेच छोटे मोठे व्यावसायिक आहेत,जे इडली सांभर,मेंदूवडे,उतप्पे असे पदार्थ विक्री करून स्वतः व कुटुंबियांचे उदरनिर्वाह करतात.
लाॅकडाउन मुळे त्यांच्या हाताबोटावर चालणार्या कमाई वर व्यवसायांवर गदा आली आहे व कुटुंबियांची उपासमार होत आहे,अश्या चिंताजनक परिस्थितित घरातील अन्नधान्य,किराणा पैसे संपल्यामुळे व कुटुंबियांची उपासमार होऊ लागल्यामुळे येथील चेन्नईहून धारावी येथे स्थाईक झालेले श्री.चिन्नम या स्थानिक नागरिकाने अश्याच तामिलनाडू येथील व्यावसायिकांची व्यथा चेन्नईतील कार्यकर्ता व रिटायर्ड आर्मी ऑफिसर श्री.विजयकुमार यांना सांगितली.
श्री.विजयकुमार यांनी या नागरिकांची अडचण लक्षात घेऊन आपल्या अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे भूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.श्री.सत्यनारायणजी पवार साहेब यांना संपर्क साधला व धारावी येथील तामिळ व्यावसायिकांची व्यथा मांडली.
मा.खा.श्री.सत्यनारायणजी पवार साहेब यांनी ताबडतोप अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब व युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांचेशी संपर्क साधून या चेन्नईतील गरीब व्यावसायिकांना अन्नधान्य व जिवनाश्यक गरजांची मदत मिळवून देणे विषयी सूचित केले.
अखिल अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब व युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांनी परिस्थितिचे गांभीर्य पाहून वारंवार स्थानिक आमदार व कैबिनेट मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांचेशी फोन द्वारे संपर्क साधला परंतू सरकार कडून मदत मिळू शकली नाही म्हणून या गरीब व्यावसायिकांची व त्यांच्या कुटुंबियांची महामारीच्या संकटात उपासमारी होऊ नये म्हणून मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब व युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांनी अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्ली(रजि) शाखा महाराष्ट्र राज्य च्या वतीने या चेन्नईतील धारावीतील स्थानिक १२००(एक हजार दोनशे) व्यावसायिकांना जिवनाश्यक वस्तु गहू,तांदूळ,दाळी,तेल,मसाला,कांदे,बटाटे,मिठ व किराणा अन्नधान्याचे पुरवठाचे वाटप केले,हे सर्व धान्य त्यांनी ठाणे येथील आपल्या अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्या ठाणे येथील कार्यकर्ते द्वारा धारावी एरियामध्ये वाटप केले.
धारावीतील सर्व गरीब व्यावसायिकांनी अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.आ.श्री.कांतीजी कोळी साहेब व युवा राज्य अध्यक्ष मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब,युवा प्रदेश अध्यक्ष,अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्ली(रजि) शाखा महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र राज्याचे सन्माननिय मुख्यमंत्री मा.ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब यांस विनंती केली आहे कि,त्यांनी रोजंदारीवर काम करणारे गरीब मजूर व छोटे फेरीवाले व्यावसायिक तसेच स्थानिक गरीब,असहाय गरीब लोकांना लाॅकडाउनच्या काळात मोफत अन्नधान्य,शिधा वाटपाचे कार्य लवकरात लवकर सूरू करून त्यांना सहाय्य करावे कारण त्यांच्या जवळचे सर्व पैसे आता संपले आहे,त्यांचे व्यवसाय बंद आहेत त्यामुळे त्यांची व त्यांच्या कुटुंबियांची उपासमारी होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी अशी विनंती मा.श्री.परेशभाई कांतीजी कोळी साहेब यांनी केली आहे.
संकलनः-
मा.श्री.अनिलदादा डी.नंन्नवरे,
खांदेश विभाग उपाध्यक्ष तथा खांदेश विभाग युवा कार्य अध्यक्ष,अखिल भारतीय कोळी समाज संघटना नवी दिल्ली (रजि) शाखा महाराष्ट्र प्रदेश


