जळगाव जिल्ह्यात केवळ अमळनेरातच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असुन गेल्या आठ ते दहा दिवसात बाहेरगावाहून मोठ्या प्रमाणात लोक आल्यानेच कोरोनाचा शिरकाव झाला आहे,अजूनही पोलिसांनी गांभीर्याने घेऊन बाहेरगावाहून येणाऱ्यांना पूर्णपणे न रोखल्यास मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे,आणि हे काम प्रामुख्याने पोलिसांचे असल्याने स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांना कडक कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात अन्यथा गरज असल्यास ही कठीण परिस्थिती हाताळण्यासाठी सक्षम पोलीस अधिकारी अमळनेरात द्यावा अशी मागणी आ.स्मिता वाघ यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे प्रत्यक्ष भेट देऊन केली.
              अमळनेरात एकही कोरोना रुग्ण नसताना गेल्या आठ दिवसात अचानक आठ रुग्ण वाढून काहींचा मृत्यू देखील झाल्याने जनता अत्यंत भयभीत झाली आहे.हा प्रसार अजून वाढण्याची शक्यता काही वैद्यकीय तज्ज्ञांनी वर्तवून पुणे मुंबई कडून आलेल्यामुळे ही लागण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केल्यानंतर यात सत्यता देखील आढळून आली आहे,अमळनेर हद्दीत चोपडाई कोंढावळ येथे जिल्हा बंदी सीमा असताना याठिकानाहून गेल्या दहा दिवसांत शेकडो लोक बाहेरगावाहून खाजगी वाहनाने आले असून काहीं जण चोरवाटानी आले आहेत,तसेच अमळनेरात हे लोक बिनधास्त येऊन देखील पोलिसांनी कोणतीही ऍक्शन घेतलेली नाही,यासंदर्भात नागरिकांडूनच पोलिसाबाबत स्मिता वाघांकडे तक्रारी आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी जळगाव येथे त्यांची भेट घेऊन वरीलप्रमाणे सत्यपरिस्थिती कथन केली,पोलीस निरीक्षकांनी एकतर अधिक कार्यतत्पर व्हावे आणि ते होत नसेल तर दुसरा सक्षम अधिकारी देऊन अमळनेरकारांचे या महाभयंकर रोगापासून संरक्षण करावे अशी विनंती त्यांनी केली.अधीक्षक उगले यांनी देखील ही बाब गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही दिली.

प्रांताधिकाऱ्यांचीही घेतली भेट

        आ.स्मिता वाघ यांनी अमळनेर येथे प्रांताधिकारी सीमा अहिरे यांची भेट घेतली यावेळी तहसीलदार मिलिंद वाघ,वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी उपस्थित होते,ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे स्क्रिनिंग करण्याची मागणी त्यांनी केली,यावर शहरातील वैद्यकीय पथकातील संख्याबळ कमी पडत असल्याने ग्रामिण भागातील डॉक्टरांना देखील शहरात कामास लावले असून वेगाने ते काम सुरु असल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले,याव्यतिरिक्त काही महत्वपूर्ण सूचना देखील स्मिता वाघानी केल्या त्यावर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली.

 ग्रामिण कार्यकर्त्याना चोरवाटा बंद करण्याचे आवाहन

अमळनेर हद्दीत चोपडाई कोंढावळ येथे जिल्हा बंदी सीमा असल्याने अनेक जण नवलनगर जवळून जवखेडा व सातरने मार्गे चोरवाटानी अमळनेरात प्रवेश करीत असल्याने याभागातील गावोगावच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकानी काटेरी वंडांग लावून दुचाकीने देखील कोणी येऊ शकणार नाही याची दक्षता घ्यावी आणि ग्रामसेवक व पोलीस पाटील आदींनी गरज असेल तेथे जेसीबीने खड्डे करून हे मार्ग बंद करावेत अश्या सूचना आ स्मिता वाघ यांनी दिल्या आहेत.

मीडिया सेंटर ची निर्मिती करावी 

      या आपत्कालीन परिस्थितीत खोट्या अफवा तालुक्यात पसरून जनता भयभीत होऊ नये तसेच योग्य माहिती व सूचना जनतेपर्यंत पोहोचण्यावसाठी प्रांताधिकारी यांच्या नियंत्रणात मीडिया सेंटर ची निर्मिती होणे आवश्यक आहे,कारण अनेकदा जिल्हा व स्थानिक प्रशासन आपापल्या स्तरावरील परिस्थिती पाहून अंमलबजावणी करीत असते अनेक पत्रकारांना प्रशासनाकडून नियमित माहिती मिळत नसल्याची तक्रार काही पत्रकार बांधवांनी केली असल्याने बंद व संचारबंदीबाबत अपडेट व खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मीडिया सेंटर सुरू व्हावे अशी अपेक्षा स्मिता वाघ यांनी व्यक्त केली आहे.