लोक न्यूज
नाशिक : पत्रकारिता आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील कार्याबद्दल डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांना आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने प्रतिष्ठेचा ‘महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमात ७ जुलै रोजी प्रसारित झालेल्या भागात अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासोबत हॉट सीटवर सहभागी झालेले शरद राजपूत तसेच अभिनेत्री रिया चित्ते यांच्या हस्ते आणि संस्थेच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डॉ. मैराळे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.
पत्रकारिता, सामाजिक कार्य आणि समाजहिताच्या विविध उपक्रमांमधील योगदानाची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या सन्मानामुळे त्यांच्या सामाजिक व पत्रकारितेच्या कार्याला नवी प्रेरणा आणि बळ मिळाले आहे.
पुरस्कार स्वीकारताना डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांनी आनंद व्यक्त केला. हा सन्मान म्हणजे आजवर केलेल्या कार्याची पोचपावती असून भविष्यातही समाजाच्या हितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सन्मानामुळे डॉ. समाधान एकनाथ मैराळे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील सामाजिक आणि पत्रकारितेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.