लोक न्यूज
अमळनेर :- "मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती" हा संदेश घेऊन जयनिल फाउंडेशन, अमळनेर तर्फे पर्यावरण पूरक गणेश उत्सवासाठी भव्य तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यशाळा दि. 6 सप्टेंबर रविवार रोजी सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत मराठा मंगल कार्यालय, अमळनेर येथे होणार आहे.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून स्वतः गणपती बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. पीओपीच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरण रक्षणाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे.
स्पर्धेचे गट आणि बक्षिसे :
या स्पर्धेत दोन गट असणार आहेत.१) बाल गट (इयत्ता १ ली ते ७ वी) :- प्रथम बक्षीस ३०००/-, द्वितीय बक्षीस २०००/-, तृतीय बक्षीस १०००/-
,२) खुला गट (वयाची अट नाही) :- प्रथम बक्षीस ३०००/-, द्वितीय बक्षीस २०००/-, तृतीय बक्षीस १०००/-
स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी / प्रशिक्षणार्थीस प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे.जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम जयश्री अनिल पाटील आणि उपाध्यक्ष वरुण राजश्री राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा हा आगळावेगळा उपक्रम असल्याने जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि गणेश भक्तांनी आपल्या मुलांसह या कार्यशाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन जयनिल फाउंडेशन, अमळनेर तर्फे करण्यात आले आहे.