पारोळा | लोक न्यूज
State Council of Educational Research and Training Maharashtra, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या SQAAF (School Quality Assessment and Assurance Framework) अंतर्गत झालेल्या शाळा गुणवत्ता मूल्यांकनात Rani Laxmibai Junior College Parola या कनिष्ठ महाविद्यालयाला मानाची ‘अ+’ श्रेणी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांपैकी पहिल्याच फेरीत ‘अ+’ श्रेणी मिळवणारे हे एकमेव कनिष्ठ महाविद्यालय ठरले असून, संपूर्ण महाराष्ट्रातही मोजक्याच महाविद्यालयांना पहिल्या टप्प्यात ही श्रेणी मिळाल्यामुळे ही कामगिरी अत्यंत गौरवास्पद मानली जात आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी महाविद्यालयाच्या सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे परिश्रम, योग्य नियोजन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे फलित असल्याचे मानले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम, नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती, स्वच्छ व सुसज्ज महाविद्यालय परिसर तसेच पालक-शिक्षक यांच्यातील प्रभावी समन्वय या सर्व बाबींमुळे महाविद्यालयाला हा मानाचा मुकुट प्राप्त झाला आहे.
या यशामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना एस. पाटील तसेच SQAAF समन्वयक डॉ. ईश्वर एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहा क्षेत्रांचे चेअरमन श्री. पी. पी. पाटील, श्री. ए. ए. मोरे, श्री. एन. व्ही. पाटील, सौ. एम. आर. नेरकर, श्रीमती एस. बी. साळुंखे आणि डॉ. एन. एन. पवार यांच्यासह समितीतील सर्व सदस्यांनी मोठ्या मेहनतीने काम केले. कनिष्ठ महाविद्यालयाचे कार्यालयीन कामकाज सांभाळणारे श्री. पी. एस. पाटील, शिपाई शिवाजी पाटील आणि दीपक भिल यांनीही या प्रक्रियेत मोलाचे योगदान दिले. या सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेऊन आवश्यक कागदपत्रे आणि अहवाल निर्धारित मुदतीत पूर्ण केले.
यानंतर शासनाकडून गठीत करण्यात आलेल्या बाह्य मूल्यांकन समितीने महाविद्यालयाला भेट देऊन दिवसभर सखोल पाहणी केली. या समितीने अभ्यासक्रम, अध्यापनशास्त्र व मूल्यांकन, पायाभूत सुविधा, मानवी संसाधने व शालेय नेतृत्व, समावेशक पद्धती व लिंगसमभाव, व्यवस्थापन-नियंत्रण व प्रशासन तसेच लाभार्थ्यांचे समाधान या सहा क्षेत्रांची तपासणी व पडताळणी केली. त्यानंतर शासनाला सादर केलेल्या गोपनीय अहवालाच्या आधारे महाविद्यालयाला ‘अ+’ श्रेणी प्रदान करण्यात आली.
महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये संस्थेचे चेअरमन मा. वसंतराव मोरे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी आणि उपनगराध्यक्ष मा. रोहन मोरे तसेच संचालक मा. पराग मोरे यांचे मार्गदर्शनही महत्त्वपूर्ण ठरले. याशिवाय जिल्हा परिषद जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, पारोळा येथील गटशिक्षणाधिकारी श्री. विश्वास पाटील, केंद्रप्रमुख रामकृष्ण बाविस्कर तसेच त्यांच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचेही सहकार्य लाभले.
या प्रक्रियेत Rani Laxmibai Senior College Parola तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनीही मनापासून परिश्रम घेतले. त्यामुळे मिळालेली SQAAF ‘अ+’ श्रेणी ही केवळ महाविद्यालयाचा अभिमान नसून गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा गौरव असल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाविद्यालयाला ‘अ+’ श्रेणी मिळाल्याबद्दल शासनाने अभिनंदन केले असून संस्थेचे चेअरमन, संचालक, प्राचार्य तसेच विविध स्तरांवरून महाविद्यालयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या यशामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची अधिक खात्री मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.