लोक न्यूज
अमळनेर : शिवसेना शहर कार्यकारणीची बैठक काल मा.आ. श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीच्या सुरुवातीला नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख भरत पवार व विलास कंखरे यांचा सत्कार करण्यात आला.
बैठकीदरम्यान शिवसेना शहर कार्यकारणी विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखत नव्या पदाधिकाऱ्यांना सामावून घेऊन लवकरच शिवसेना शहर कार्यकारणी घोषित करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करत मा.आ. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वामुळे अमळनेरमधील शिवसेनेला नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.
यावेळी तालुकाप्रमुख गुलाब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक महेश देशमुख व नगरसेवक दादा पवार यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.
मा.आ. शिरीषदादा चौधरी यांनी “गाव तिथे शाखा आणि प्रभाग तिथे शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक शिवसैनिकाला बळ देण्याचा निर्धार व्यक्त केला. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे, गोरगरीबांच्या मदतीला धावून जाणे, लोकसंपर्क वाढवणे तसेच सदस्य नोंदणी व विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संघटन बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले. भविष्यात क्रियाशील शिवसैनिकांना पदांच्या माध्यमातून जबाबदारी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला नगर परिषदेचे गटनेते पंकज चौधरी, दुसरे गटनेते महेश देशमुख, नगरसेवक दादा पवार, नगरसेवक अबू महाजन, नगरसेवक श्रीराम चौधरी, नगरसेवक मोहन सातपुते, बाळु पाटील, बाळासाहेब संदानशिव, नगरसेवक कैलास पाटील, ॲड सुरेश सोनवणे, नगरसेवक नाविद शेख, नगरसेवक दिपक चौगुले, नगरसेवक ज्ञानेश्वर धनगर, पंकज भाई, नाना धनगर, अवि जाधव, विजेंद्र शिरसाळे, संतोष पाटील, चंद्रकांत कंखरे, गुलाम नबी, कमलेश चौधरी, पंकज भावसार, राजा शेख, प्रमोद शिंपी, अमन, सनी चव्हाण, शंतनु भावसार यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.