लोक न्यूज

अमळनेर  दि.अमळनेर अर्बन बँक येथे आयोजित समग्र आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो नागरिकांनी ५० पेक्षा अधिक विविध प्रकारच्या आरोग्य चाचणीचा मोफत लाभ घेतला.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष तसेच दि अंमळनेर को ऑप.अर्बन बँकेच्या शतकोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक, अमळनेर सहाय्यक निबंधक कार्यालय सहकार खाते तसेच लायन्स क्लब,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सदरचे भव्य समग्र आरोग्य तपासणी शिबिर अमळनेर अर्बन बँकेतर्फे आयोजित करण्यात आले होते.
               सदरच्या मोफत समग्र आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे,  लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉ.संदीप जोशी, सहाय्यक निबंधक कुणाल सोनार ,व्हाईस चेअरमन रणजित शिंदे, मुंदडा फाउंडेशन चे अध्यक्ष प्रकाश मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले. "आरोग्याच्या काळजीसाठी समग्र आरोग्य तपासणी महत्वाची ठरते' असे यावेळी बोलतांना लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉ. संदिप जोशी यांनी सांगितले.चेअरमन पंकज मुंदडे यांनी ' लोकोपयोगी उपक्रमातून सामाजिक योगदान बँक देत आहे असे सांगितले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी ' सभासद हिताची जपवणूक करतांना सामाजिक उत्तरदायित्व देखिल पार पाडण्यासाठी अर्बन बँक कटिबद्ध आहे ' असे सांगितले .याप्रसंगी मंचावर अमळनेर अर्बन बँकेचे संचालक प्रदिप अग्रवाल, लक्ष्मण महाजन, प्रविण पाटील, दिपक साळी, सौ.वसुंधरा लांडगे, डॉ .मनीषा लाठी, विजय बोरसे यांचेसह लायन्स ट्रेझरर नितीन विंचूरकर, माजी प्रांतपाल डॉ.रविंद्र कुलकर्णी,रिजन चेअरमन योगेश मुंदडे , बँकेचे निवडणूक अधिकारी जगताप , झोन चेअरमन विनोद अग्रवाल,व्यवस्थापक अमृत पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.आभार लायन्स सेक्रेटरी महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले.
                    सदर  शिबिरात अमळनेर अर्बन बँकेच्या सन्माननीय सभासद ,जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य, ठेवीदार,कर्जदार, ग्राहक व बँकेचे कर्मचारी,पिग्मी एजंट , लायन्स सभासद , बँकेचे हितचिंतक विशेषतः महिला वर्गाने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शेकडोंच्या संख्येने लाभ घेतला. जेष्ठ नागरिक संघ अध्यक्ष उमाकांत नाईक,सचिव एस एम पाटील, जयवंतराव पाटील आदींची प्रातिनिधिक तपासणी चाचणी करून शिबिराची सुरवात करण्यात आली.याप्रसंगी अमळनेर लायन्स क्लबचे पदाधिकारी सभासद यांचेसह डॉ.मिलिंद नवसारीकर, माजी उपनगराध्यक्ष पांडुरंग महाजन, मुन्ना शर्मा, जितेंद्र झाबक, कृ उ बा संचालक भोजमल पाटील, एस डी भरूचा,डॉ.मयुरी जोशी,कांचन शहा, सौ.शैलजा शिंदे ,शेखर धनगर, अजय हिंदुजा, जितेंद्र जैन,राजेश शहा,प्रकाश शहा, प्रशांत सिंघवी, हेमंत पवार, दिलीप ठाकूर, जितेंद्र पारख,ॲड.किशोर बागुल, ॲड.राजेंद्र चौधरी,ॲड.विवेक लाठी,चेतन जैन, जितेंद्र गोहिल, राजू नांडा, प्रितम मणियार,महेश पवार,दिलीप गांधी,मुकुंद विसपुते, सुभाषचंद्र सोमाणी, राजू फाफोरेकर, सत्यपाल निरंकारी, उदय शहा, डॉ.संजय शहा,प्रसन्न शहा,राजेश जीवनानी ,प्रदिप जैन ,बंडू जैन, प्रा.जितेंद्र पाटील, प्रसाद शर्मा आदींची उपस्थिती होती.
                 कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे, व्हाईस चेअरमन रणजित शिंदे  यांचेसह बँकेचे संचालक मंडळ  मोहन सातपुते,पंडित चौधरी,प्रविण जैन, भरत ललवाणी,अभिषेक पाटील,ॲड व्हि आर पाटील यांचे सहकार्य लाभले तर बँकेचे व्यवस्थापक अमृत पाटील , कर्मचारी वृंद ,पिग्मी एजंट , सुनिल महाजन ,सहाय्यक निबंधक कार्यालय अमळनेर यांनी प्रयत्न केले.यावेळी मुंबई येथिल नामांकित आरोग्य संस्था जनरल डायग्नोस्टिक लॅबोरेटरी सह माऊली मेडिकल फाउंडेशनच्या पॅथेलॉजिकल टीम तर्फे नागरिकांच्या थायरॉईड प्रोफाइल च्या ३ चाचणी,किडनी प्रोफाइल च्या ७ चाचणी,पूर्ण रक्त चाचणी HbA1c च्या २ चाचणी, लिव्हर फंक्शन यकृतच्या ११ चाचणी , रक्त हिमोग्राम तपासणीCBCच्या २८ टेस्ट ,(lipid) लिपिड प्रोफाईल च्या ८ टेस्ट लोह चाचणी ,आयर्न स्टडीज च्या ३ चाचणी अशा विविध प्रकारच्या जवळपास ३५०० रुपये किंमतीच्या ५० पेक्षा अधिक प्रकारच्या चाचणी आरोग्य तपासणी शिबिरात  मोफत करून देण्यात आल्यात.