लोक न्यूज
जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रासाठी ज्ञानदीप सांगोरे यांची "जिल्हा कार्याध्यक्ष" तर करण साळुंखे यांची "जिल्हा उपाध्यक्ष" पदावर निवड करण्यात आली आहे. गुरुवार, दिनांक ३ जुलै २०२५ रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. सुनीलजी तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विविध सेलचे प्रदेशाध्यक्ष यांच्या सोबत झालेल्या जळगाव जिल्हा दौऱ्यादरम्यान ही निवड अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली.
या वेळी राज्याचे माजी मंत्री मा. अनिल पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मा. सुरज चव्हाण, जिल्हाध्यक्ष मा. संजय पवार, तसेच सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड यांचीही उपस्थिती होती. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “पक्षाच्या विचारधारेचा आणि धोरणांचा प्रसार सोशल मीडियाच्या प्रभावी माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया विभाग महत्त्वाची भूमिका बजावेल.”
या निवडीमुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया यंत्रणा अधिक सक्षम होऊन संघटनात्मक दृष्टिकोनातून पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.