लोक न्यूज
गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मोठा आधार, २०२५-२६ मध्येही योजनेला मिळणार कायमस्वरूपी चालना*

*प्रतिनिधी अमळनेर-* शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. विशेषतः दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी शासनाबरोबरच खाजगी संस्था देखील पुढे सरसावू लागल्या आहेत. याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे सरस्वती महाविद्यालय, देवगाव देवळी (ता. अमळनेर, जि. जळगाव) या संस्थेने AAY – अंत्योदय अन्न योजना अंतर्गत पिवळे रेशन कार्डधारक विद्यार्थ्यांची संपूर्ण फी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये B.C.A. व B.Sc. विभागातील एकूण ३६ विद्यार्थ्यांना संपूर्ण महाविद्यालयीन फी माफ करण्यात आली होती. यामध्ये विशेषत: पिवळे अंत्योदय रेशन कार्डधारक (AAY – Antyodaya Anna Yojana) विद्यार्थ्यांचा समावेश होता. ही योजना केवळ एकवटलेली मदत न राहता या चालू शैक्षणिक वर्षात (2025-26) देखील नियमितपणे राबवली जाणार आहे, अशी माहिती महाविद्यालय प्रशासनाने दिली.

*काय आहे AAY कार्डधारक विद्यार्थ्यांची ओळख.?*
AAY म्हणजे अंत्योदय अन्न योजना, ही भारत सरकारची एक विशेष योजना असून दारिद्र्य रेषेखाली अत्यंत गरीब व वंचित घटकांमधील कुटुंबांना अत्यल्प दरात अन्नधान्य पुरवण्यात येते. या कार्डधारक कुटुंबांतील विद्यार्थी हे अनेकदा उच्च शिक्षण घेण्याच्या मार्गावर आर्थिक अडचणींमुळे अडथळा येतो. याच पार्श्वभूमीवर सरस्वती महाविद्यालयाने हा स्तुत्य उपक्रम राबविला आहे.

*महाविद्यालयाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित-* या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक समतेचा आदर्श निर्माण होत असून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थेचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांनी 'शिक्षण हे लाभ मिळवण्यासाठी नव्हे, तर सेवा करण्यासाठी असावे' या तत्त्वावर विश्वास ठेवून ही योजना जाहीर केली आहे.

*पात्रतेचे निकष-* १) विद्यार्थ्यांकडे AAY अंत्योदय पिवळे रेशन कार्ड असणे बंधनकारक आहे. २) सदर कार्डावर शासनाचे अधिकृत शिक्कामोर्तब असणे आवश्यक आहे. ३) पात्रतेची पडताळणी महाविद्यालयीन प्रशासनामार्फत होणार आहे.  *आवाहन-* महाविद्यालय प्रशासनातर्फे सर्व पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपले रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही त्यांनी फी माफी योजनेचा लाभ घेऊन शिक्षण सुरू करण्याची संधी दवडू नये.

*🖋 हा उपक्रम म्हणजे गरिबांच्या शिक्षणाच्या प्रवासात एक महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत असून, शिक्षणातील समतेसाठी संस्थेचा सामाजिक दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे.*

📍स्थान- सरस्वती महाविद्यालय, देवगाव देवळी, ता. अमळनेर, जि. जळगाव
📞 संपर्क- प्राचार्य
(सरस्वती महाविद्यालय देवगाव देवळी ता.अमळनेर) 9423479388