अमळनेर : भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी अमळनेर पेटवून इंग्रजांना भीती निर्माण केली होती त्या थोर क्रांतिकारक डॉ उत्तमराव पाटील ,लीलाताई पाटील यांचे स्मारक झाकलेले असल्याने ते क्रांतीपर्व आता विविध मुद्द्यांनी पेटू लागले आहे. या स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी आता लोकप्रतिनिधी जागृत झाले असून पालिकेला साकडे घालण्यात आले आहे.
शहरातील ढेकु रोड भागात असलेल्या क्रांतिवीर डॉ.उत्तमराव पाटील व क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील यांच्या क्रांतीपर्व स्मारकाचे तात्काळ लोकार्पण करण्यात यावे या मागणीसाठी माजी नगरसेवकांसह नागरिकांनी मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन दिले आहे.
शहरातील ढेकु रोड भागात नगरपालिकेच्या खुल्या भूखंडावर वैशिष्ट्यपूर्ण निधीतून तालुक्यातील डांगरी येथील डॉ.उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.मात्र मागील अनेक महिन्यांपासून हे स्मारक लोकार्पणाच्या प्रतीक्षेत आहे.प्रशासनाच्या वेळ काढू धोरणामुळे स्मारकाचे लोकार्पण रखडल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला असून यामुळे महापुरुषांचा अपमान होत असल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे. यामुळे लवकरात लवकर माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील व खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवकांसह डांगरी ग्रामस्थांनी केली आहे.
निवेदनावर माजी नगरसेवक विवेक पाटील,राजू फाफोरेकर,गायत्री दीपक पाटील, अँड. चेतना यज्ञेश्वर पाटील यांच्या सह्या आहेत.तर डांगरीचे माजी सरपंच अनिल शिसोदे यांनी देखील हीच मागणी केलेली आहे.
हा जनतेचा भावनेचा प्रश्न आहे लवकरच यावर चर्चा करून निर्णय घेतला जाईल- तुषार नेरकर , मुख्याधिकारी अमळनेर नगरपरिषद