
लोक news-
अमळनेर : जयहिंद व्यायामशाळा आणि राजे शिवाजी मित्रमंडळातर्फे आयोजित कुस्ती स्पर्धेत धुळ्याच्या रितीक राजपुतने पाचोऱ्याच्या विपुल जावडेकर ला पराभूत करून मानाची गदा आणि ११ हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. एकूण २२ ठेक्याच्या कुस्त्या झाल्या.
शिरूड नाका भागातील छत्रपती शिवाजी नगर भागात १३ एप्रिल रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते रितीक राजपूत आणि विपुल जावडेकर यांची जोड लावण्यात आली. यावेळी अनिल पाटील म्हणाले की कुस्ती स्पर्धांमुळे युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण होऊन आत्मविश्वस ,संघ भावना निर्माण होऊन अशा स्पर्धा सक्षम नागरिक पर्यायाने सक्षम भारत घडवण्यासाठी पूरक ठरणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डीवायएसपी विनायक कोते ,परिविक्षाधीन डीवायएसपी केदार बारबोले , मंगळ ग्रह सेवा संस्थांचे अध्यक्ष डॉ डिगंबर महाले धुळ्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील , माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , बिल्डर प्रशांत निकम , चेतन सोनार ,डॉ संदीप जोशी ,डॉ भूषण पाटील , चेतन राजपूत , संजय पाटील , किरण पाटील , विवेक अहिरराव ,भरत पवार ,सुनील मोरे ,ज्ञानेश्वर पाटील ,पिंटू सोनार , विनोद कदम उपस्थित होते.
माजी नगरसेवक प्रताप शिंपी , सुरज शिंपी , पवन शिंपी ,जीवन पवार ,अमोल चौधरी ,सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २२ ठेक्याच्या कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. या स्पर्धांमध्ये जळगाव ,धुळे ,एरंडोल ,पाचोरा ,चाळीसगाव आदी ठिकाणाहून पैलवान आले होते. सूत्रसंचालन प्रवीण पाटील आणि अरुण पाटील यांनी केले. पंच म्हणून रावसाहेब पैलवान , विठ्ठल पैलवान , विनोद पैलवान ,संजय पैलवान आदींनी काम पाहिले. स्पर्धेसाठी मंगळ ग्रह मंदिराचे सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बबलू पाटील , मधू चौधरी , गिरीश पाटील , पवन चौधरी ,सुनील पाटील , दीपक चौधरी भोमेश पैलवान आदींनी सहकार्य केले. बाहेरगावाहून आलेल्या पैलवानांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.