वैजापूर-लोक न्यूज
होळी व धुलिवंदन दिनाचे औचित्य साधत रविवार(ता,२४)रोजी येथील पाटील गल्ली मित्र मंडळ, पत्रकारमंडळ,,अधिकारी यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कारप्राप्त सामाजिक कार्यकर्ते, जेष्ठ साहित्यीक ,जलदुत, स्वच्छतादूत म्हणून कार्यरत धोंडीरामसिंह राजपूत यांचा पाटील गल्लीतील मारोती मंदिरात सत्कार करून त्यांचे अभिनंदन केले,जेष्ठ पत्रकार व संपादक घनश्याम वाणी, एल आय,सी अधिकारी सी,के,पवार,वसुली अधिकारी ज्ञानेश्वर अनर्थे,सेवा निवृत्त मंडळ अधिकारी अशोक आप्पा पवार खंडाळकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी बाळासाहेब वाणी, सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब गावडे, राजेंद्र पा, साळुंके,अशोक अण्णा चव्हाण, यांनी राजपूत यांना शाल, श्रीफळ, बुके,व हार देऊन सत्कार केला व अभिनंदन केले.