लोक न्यूज-
पदवी प्रदान समारंभ खरं तर फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर केला जातो. पण पुर्व प्राथमिकचा हा छोटा बालवर्ग पूर्व प्राथमिक मधून प्राथमिकमध्ये पदार्पण करीत असताना त्यांचे  कौतुक करण्यासाठी व  त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेतर्फे राबविण्यात आला.

यावेळी एकूण १०३ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका प्राचार्य नीरज चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व महत्त्व वर्गशिक्षिका मंगला चौधरी यांनी मांडले. आलेल्या सर्व प्रमुख पाहुणे व पालकांचे  देवयानी पाटील यांनीआभार मानले. सूत्र संचालन ज्योत्स्ना पाटील आणि महिमा भदाने यांनी केले.