लोक न्यूज-
आज दिनांक 23-03-2024 सकाळी 11.00 वाजता गं.स हायस्कुल अमळनेर येथे 15 अमळनेर विधानसभा मतदार संघातर्गत अमळनेर तालुक्यातील सर्व आशा सेविका व अंगणवाडी सेविका यांची बैठक मा. सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री. महादेव खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याच्या हेतुने 6 ते 9 महिन्यातील गर्भवती महिला व 0 ते 3 महिने प्रसुती माता यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आशा ताई व अंगणवाडी ताई यांनी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. गावातील मतदान केंद्रा शेजारील पाळणा घराची सुविधा उपलब्ध करुन देऊन मतदान वाढीसाठी प्रयत्नशिल रहावे व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तसेच ज्या नवविवाहीत महिलांची मतदार यादीत नाव समाविष्ट नसेल त्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही करावी. सदर बैठकीस श्री. रुपेशकुमार सुराणा, तहसिलदार अमळनेर, श्रीमती. प्रेमलता पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी, श्री. प्रशांत धमके निवडणूक नायब तहसिलदार व तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.