वैजापूर- लोक न्यूज
देशात महिला व मुलींवर वाढते अन्याय,अत्याचार,
हिंसात्मक घटना ,लैंगिक अत्याचार,कौटुंबिक अत्याचार ,हुंडापद्धती या सर्वप्रकारच्या दलदलीतून महिलांना बाहेर काढण्यासाठी शासन,सेवाभावी संस्था
,सामाजिक कार्यकर्ते यांनी सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी तालुक्यातील शिवराई येथें शुक्रवार(ता,०८)रोजी महिला हिंसा विरुद्ध दिवस या महिला जनजागृती फेरीसमयी केले, ते पुढे म्हणाले की,कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण कायदा -२००५/२००६,तसेच लैंगिक अपराधापासून बाल संरक्षण कायदा पोस्को(pocso) ,घटनेच्या कलम १४ नुसार महिला भेदभावापासून मुक्ती, कलम १५अन्वये स्त्री-पुरुष समानता ,हुंडा विरुद्ध कायदा याची माहिती ग्रामीण भागातील महिला पर्यंत पोहचवावी म्हणून वैजापूर येथील सामाजिक बांधिलकी जपणारी निर्मला इन्स्टिट्यूट यांच्या कार्याला सलाम मात्र या सामाजिक संस्थेच्या खांद्याला खांदा लावून सर्वांनीच महिला हिंसा विरुद्ध आवाज उठविल्यास महिलांचे सक्षमीकरण होईल ,या साठी जनजागृती आवश्यक आहे, गेल्या २५नोव्हेंबर,२०२३पासून या संस्थेने लोणी, बोरसर,जरुळ,खंडाळा, भायगाव,बिलोणी येथे महिला हिंसा विरुद्ध दिवस निमित्त  हा पंधरवडा महिला मेळावे,महिला प्रबोधन,शालेय मुलां-मुलींची फेरी काढून जागृती केली आहे,शिवराई येथील कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक  ई, बी,गवळी अध्यक्षस्थानी होते तर निर्मला इन्स्टिट्यूट च्या नॅन्सी रोद्रीग्ज,व मार्गारेट यांची प्रमुख उपस्थिती होती,संघटक छाया बंगाळ व श्रीमती वंदना यांनी सहभाग नोंदविला,श्री गवळी व मार्गा रेट यांनीही महिला हिंसा व अत्याचार थांबावे म्हणून समाजाने ही पुढाकार घ्यावा असे आवाहन केले,या प्रसंगी आर.झेड.परदेशी,आर .एस. पगारे,एस. के.तुंबारे,एस. एन. बलीकोंडवार, एस. टी. भुजाडे, बी.टी. वानखेडे,पी,ए कळसकर,श्रीमती व्ही.पी.शेजवळ,बी.के.नागरे,मेजर आर.एस कसबे,डी.के,.भक्कड, जी बी,गायके यांनी सहभाग नोंदविला छाया बंगाळ यांनी आभार मानले.