वैजापूर-लोक न्यूज
समाजातून एच,आय,व्ही,एड्स चे समूळ उच्चाटन होऊन समाजाने निरोगी जीवन जगावे व आपल्या कुटुंब,समाज देशाच्या विकास व उन्नतीत सहभागी व्हावे म्हणून शुक्रवार(ता,०१)रोजी उपजिल्हा रुग्णालय ,प्रेरणा सामाजिक संस्था, विनायकराव पाटील महाविद्यालय छात्र,सेंट मोनिका छात्र,आनंद नर्सिंग महाविद्यालयचे शिकणाऱ्या नर्सेस मुलं, मुली,न्यू हायस्कुल विद्यार्थी, जिल्हा परिषद कन्या प्रशाला मुली यांच्या सयूंक्त विद्यमाने सकाळी नऊ वाजता शहराच्या
मुख्य मार्गावरून भव्य रॅली काढून जन जागृती करण्यात आली",संयम पाळा-एड्स टाळा,"क्षणाची मजा;एड्स ची सजा"जन जागृती करू या-एड्स ला आळा घालू या",एकमेका शिकउ या-एड्सला-वेळीच रोखू या"अशा घोषणा देत या रॅलीचे संचलन सामाजिक कार्यकर्ते धोंडीरामसिंह राजपूत यांनी केले,तालुक्याचे आ,प्रा,रमेश पा, बोरनारे,उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप,तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र पा,साळुंके, कृषी उत्पन्न समिती
संचालक प्रशांत त्रिभुवन ,व माजी जि,प,सदस्य पंकज ठोंबरे,सामाजिक कार्यकर्ते धोंडीराम राजपूत ,वैद्यकीय डॉ,मुंढे, उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिकारी डॉ,दीपमाला परदेशी,विजय पाटील,शशिकांत पाटील व प्रेरणा सामाजिक संस्थेचे साईनाथ बारगळ, बापू वाळके,वि,पा, कॉलेजचे डॉ, एस, डी,हिवाळे,डॉ,व्ही जी,लोणे यांनी रॅली ला हिरवा ध्वज दाखविला, या डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून , निमित्ताने आयोजित चित्र प्रदर्शनचे उदघाटन करून रॅली आरंभ झाली,हातातील घोषणा फलक,घोषणा देत रॅली जि,प,कन्या प्रशाला येथे विसर्जित झाली,जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षी घोष वाक्य" आघाडी समुदायाची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने" हे सांगून राजपूत यांनी जागतीक एड्स दिनाची शपथ दिली,या प्रसंगी प्राचार्य किशोर साळुंके, एस, के,पगार, तसेच के,बी,वाघ,संजय हिंदोळे,मनीषा जाधव,राजेंद्र
लाठे, पंकज कांबळे, मयूर ठोंबरे,माया पाटील,अक्षदा जाधव, वैष्णवी साताळकर,श्रीमती भोये,श्रीमती दह्याटे, श्री निकाळे, श्री सूर्यवंशी आदींनी सहभाग नोंदविला शेवटी किशोर वाघुले यांनी आधार मानले

