कथा सादर करताना धोंडीरामसिंह राजपूत
 


वैजापूर/गंगापूर-लोक न्यूज
"वाचाल तर वाचाल" हे सुभाषित पायदळी तुडवून आज मुलं-मुली मोबाईल व टी ,व्ही संस्कृती  "पाहाल तर जगाल"असे समजुन वाचन सोडून सर्रास मोबाईल व टी, व्ही पाहण्यात गुंग आहेत,यामुळे ते आपल्या करिअर पासून दूर व खूप दूर जात आहेत हे वेळीच थांबविण्यासाठी  पालकांनी मुलां-मुलींना मोबाईल व टी, व्ही पासून दूर ठेवण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याची नितांत गरज आहे,असे प्रतिपादन मराठवाड्याचे जेष्ठ बालसाहित्यक व वृत्तपत्र स्तंभ लेख धोंडीरामसिंह राजपूत यांनी  गंगापूर येथील मुक्तानंद महाविद्यालयात आयोजित  ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनातील बालमेळाव्यातील कथाकथन  कार्यक्रमात अध्यक्ष पदावरून बोलताना केले ते पुढे म्हणाले की,बालकथा  लेखक व कवी यांनीही आपले लेखन नैतिक,सामाजिक, राष्ट्रीय ,पर्यावरण पूरक ,व कौटुंबिक मूल्यांना धरून मुलं -मुली वाचून अनुकरण करतील असे लेखन करण्यावर भर द्यावा असेही राजपूत पुढे म्हणाले,त्यांनी एक मूल्य कथा सादर केली या कथाकथनात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील बालकथाकारानी भाग घेतला यात त्र्यंबक वडस्कर,गेनू शिंदे,धनंजय गुडसुरकर,अलका सपकाळ, प्रकाश जाधव,विशाल तायडे,संजय येरवाड, यांनी आपल्या दर्जेदार कथा सादर करून उपस्थितांची मन जिंकली सूत्र संचलन
रविराज काळे यांनी केले,आभार श्रीमती पालोदकर व संदीप गायके यांनी मानले.