लोक न्यूज-
दि. 07/12/2023 रोजी सपोनि श्री सुरेश शिरसाठ सो. यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सेधव्या कडुन शिरपुर कडे एक आयशर कंटेनर मध्ये दारु घेवुन जात आहे अशी माहिती मिळाल्याने पोसई श्रीमती मंगला पवार पोना. संदिप ठाकरे पोकॉ. कृष्णा पावरा , संतोष पाटील, ईसरार फारुकी अशांना दालणात बोलावुन सदर वाहनाचा शोध घेणे कामी आदेशीत केल्याने सदर पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार असे पेट्रोलींग करीत वाहनाचा शोध घेत असतांना आयशर वाहन क्र. एन.एल.01, ए.सी.-2876 हि हाडाखेड चेकपोस्ट जवळ मिळुन आल्याने सदर वाहन हे चेक केले असता वाहनावरील चालक हा वाहन सोडुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला परंतु तो मिळुन आला नाही. म्हणुन सदर वाहनाचे केबीनची पाहणी केली असता त्यात एक मोबाईल मिळुन आला त्यावर एक फोन येत होता सदर मोबाईल फोन उचलुन विचारपुस केली असता वाहन मालक बोलत असलेल बाबत त्यंनी सांगीतल्याने वाहनाचे मालकाला वाहनाला लावलेल्या सिल तोडुन वाहनाची झडती करावयाची असले बावत कळविल्याने त्यांनी सिल तोडण्याची परवानगी दिल्याने आम्ही सिल तोडुन सदर वाहनाची झडती घेतली असता त्यात खालील वर्णनाची देशी- विदेशी कंपनिची दारु मिळुन आली असुन सदरची दारु हि फक्त चंदिगड केंद्रशासीत प्रदेश मध्येच विकण्याची परवानगी आहे. सदर ची दारु महाराष्ट्रात विकुन महाराष्ट्र शासनाचा कर बुडवुन शासनाची फसवणुक करीत आहे. सदर वाहनात मिळुन आलेल्या देशी-विदेशी दारु सह असा एकुण 23,00,400/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री सचिन हिरे. यांचे मार्गदर्शनाखाली शिरपुर तालुका पोलीस ठाणेचे सपोनि/सुरेश शिरसाठ, पोसई- सुनिल वसावे, मपोसई/ मंगला पवार, पोना.संदिप ठाकरे पोकॉ.कृष्णा पावरा, चापोहेकॉ.संतोष पाटील,ईसरार फारुकी, यांनी केलेली असुन सदर गुन्ह्याबाबत पोना. संदिप ठाकरे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिल्यावरुन शिरपुर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.


