लोक न्यूज-
मुंबई, भारत – मुंबईचा ऐतिहासिक केंद्रबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडियाने दि.१० डिसेंबर रोजी पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवला.WDDD INTERNATIONAL द्वारे आयोजित वर्ल्ड  डिजिटल डिटॉक्स डे मोठ्या  उत्साहात येथे साजरा झाला. 5 ते 12 डिसेंबर या कालावधीत झालेल्या या जागतिक स्तरावरील कार्यक्रमाने विविध क्षेत्रातील दिग्गजांना एकत्र आणले आणि 65 देशांना सजग डिजिटल आरोग्यादायी जीवनासाठी आवाहन केले.  
डिजिटल दुनियेच्या जगात डिजिटल डिटॉक्सचा आयुष्य बदलवून टाकणारा अनुभव देणारा दैपिप्यमान कार्यक्रम आज १०  डिसेंबर रोजी भव्य गेटवे ऑफ इंडियाच्या प्रांगणात झाला. 
आयर्लंडच्या कौन्सल जनरल श्रीम. अनिता केली, 
माजी आमदार  शिरीष चौधरी
सामाजिक कार्यकर्त्या मंजू लोढा, सीमा सिंग, लक्झरी मॅनेजमेंट आयकॉन निशा जामवाल, वेलनेस गुरू मिक्की मेहता, सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. अली इरयानी, एसपी जैन ग्लोबलच्या मालती जैन,, डॉ. गणेश धुमाळ, कुलदीप सरमा (सह-संस्थापक आणि प्रो-चांसलर मेधावी स्किल्स युनिव्हर्सिटी, सिक्कीम), पर्यटन मंत्रालयाचे प्रतिनिधी जिंतेंद्र जाधव, अग्नेलोरजेश अथाईडे (चेअरमन: ग्लोबल सेंट अँजेलो ग्रुप ऑफ कंपनी), यशवंत वानखेडे (माजी संचालक, NYKS), श्री संतोष पाटील (सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संचालक) आणि वर्ल्ड  डिजिटल डिटॉक्स डे च्या संस्थापक आणि ग्लोबल वेलनेस सेलिब्रिटी रेखा चौधरी यांनी, अर्थपूर्ण आणि खऱ्या वास्तव  नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करून, भासमान डिजिटल जगापासून जाणीवपूर्वक वेगळे होण्याच्या खरी गरज आहे असेप्रतिपादन केले.
या रंगलेल्या  सोहळ्यादरम्यान, डिजिटल डिटॉक्सबद्दलच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन प्रसिद्ध चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांना युनिक अवार्डने सन्मानित करण्यात आले. आपल्या भाषणात श्री.खेर यांनी डिजिटल युगात समतोल साधण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले.
साहित्य लेखन राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा, विद्यापीठांमधील सामंजस्य करार आणि महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या सक्रिय सहभागासह विविध उपक्रमांनी हा सोहळा उत्साहाने पार पडला. भारतात सुमारे 1,10,446 हून अधिक शाळा, 26,15,629 लाख विद्यार्थी आणि 50,00000 लाख पालक या व्यापक चळवळीचा भाग बनले आहेत आणि या कार्यात सदैव कार्यरत आहेत. डिजिटल डीटोक्स बाबतीत मा. पंतप्रधानांना पत्र लिहिणे आणि त्याबाबतीत शपथ घेणे असे उपक्रम  असंख्य शाळा आणि विद्यापीठांमध्ये झाले, या मध्ये विशेष करुन आदिवासी आणि खेडेगावातील शाळा आहेत. श्रीम. वैशाली चव्हाण (समिती सदस्य भारत, WDDD INTERNATIONAL) यांनी लेखन स्पर्धा आणि सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सातत्याने  काम केले.
इंडोलॉजिस्ट लालती मिश्रा आणि चित्रपट निर्माते गंजेंद्र अहिरे यांनी ज्युरी सदस्य म्हणून दिलेल्या योगदानाबद्दल यावेळी धन्यवाद मानले.
प्रत्येक भाषेतील  प्रथम दोन क्रमाकांना रोख रकमेची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आले. तसेच पोवाडा, भारुड, आराधी गीत आणि लेखासाठी उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात आली.
500 आउटलेटसच्या माध्यमातून  या चळवळीत सहभागी झालेल्या आरोग्यजगताने WDDD ला प्रेमाने  स्वीकारले   भारताबाहेर ,वेगवेगळ्या देशातील  65 राजदूतांनी आपापल्या देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले, त्यामुळे WDDD 2023 खरोखरच इतिहासामध्ये सुवर्णअक्षरे उमटवणारी जागतिक घटना बनली आहे..

जागतिक सहभाग ठळक मुद्दे:

1. सर्बिया: राजदूत नतासा आणि तिच्या ग्रुपने सर्बियाच्या प्रसिद्ध थर्मल, माउंटन आणि सिटी वेलनेस आणि स्पा रिसॉर्ट्स आणि हॉटेल्समध्ये डिजिटल डिटॉक्सच्या मदतीने निरोगी जीवनशैली कशी अंगीकारावी  आणि निसर्गाशी एकरूप कसे व्हावे यासाठी  कार्यक्रम आयोजित केले.
2. बाली: डिजिटल उपकरणापासून स्वत:ला दूर ठेवत आपल्या बेटाच्या निसर्ग सौंदर्याला हृदयाशी धरत जीवन आनंददायी कसे बनवता येईल यासाठी राजदूत जॉन टीजी नेल्सन यांनी बालीमध्ये एका भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. 
3. फिलीपिन्स: सजगता, सर्वांगीण आरोग्य आणि निसर्गाशी एकरूप होण्याचे आपले संबंध वाढीस लागतील अशा रीतीने  फिलीपिन्सच्या राजदूताने सॅन बेनिटो येथील द फार्म येथे मोफत डिजिटल डिटॉक्स विविध उपक्रमांची आखणी केली होती.
4. हंगेरी: हंगेरीच्या राजदूताने, युरोपमधील पर्यटन विकास प्रकल्पासह, बुडापेस्टमध्ये आकर्षक योग सत्र आयोजित करून समाजाला डिजिटल मुक्त निसर्ग अनुभवाचा घेता येतो, याचा सर्वांग सुंदर अनुभव घेता येतो याचा प्रत्यय दिला.
5. भारत: WDDD च्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी यांनी वर्ल्ड  डिजिटल डिटॉक्स डे निमित्त दोन मेगा इव्हेंट्सचे आयोजन केले. या उपक्रमांमध्ये  500,000 शालेय मुलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेतले. यामध्ये भारताचे मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांना 200,000 लाख पत्रे लिहिणे याचा समावेश आहे. याशिवाय डिजिटल डीटोक्सबद्दल शपथ घेणे अंतर्भूत होते.हा पत्रलेखन आणि शपथविधीचा उपक्रम आदिवासी व ग्रामीण भागापर्यंत पोहचला, हे महत्वाचे. 
6. मेक्सिको: मेक्सिकन राजदूताने या कार्यक्रमाच्या पूर्व तयारीसाठी आपले महत्वपूर्ण विचार मांडले.आणि  10 डिसेंबरच्या सोहळ्यासाठी सज्ज झाले.
7. युनायटेड स्टेट्स (मियामी): मियामी राजदूताने स्थूलता( लट्ठपणा) आणि पोषण यांसारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून जेवताना मोबाइल वापर केल्यास  काय परिणाम होतो यावर प्रकाश टाकणारे एक नाविन्यतापूर्वक  सत्र आयोजित केले.
8. व्हिएतनाममधला भव्य सोहळा: व्हिएतनाममध्ये, डिजिटल डीटोक्सच्या जागतिक चळवळीला हातभार लावणाऱ्या बायनी ट्रीच्या वेलनेस तज्ञांनी एक कल्पक  सोहळा  आयोजित केला  होता. यामध्ये डिजिटल उपकरानांविषयी  सजगता, सर्वांगीण आरोग्य आणि डिजिटल युगात निसर्गाशी एकरूप कसे होते येईल यासंबधीच्या कार्यशाळा आयोजित केल्या होत्या.
9. दुबई: दुबईच्या राजदूतानेडिजिटल डिटॉक्सच्या संदर्भात  जागतिक संवाद कसां साधता येईल याविषयी जाणीव जागृती मोहीम आयोजित केली.
या वर्षीच्या कार्यक्रमात  उचललेली महत्त्वाची पाऊले:
- संशोधन प्रकाशन:* वैयक्तिक जीवनावर डिजिटल डिटॉक्सचा  कसा परिणाम होतो हे सांगणाऱ्या पहिल्या संशोधन पत्राचे  प्रकाशन या वेळी झाले.
- गाणे लाँच: डिजिटल डिटॉक्सची चळवळीचीभावना प्रतिध्वनित करणाऱ्या गाण्याचे यावेळी अनावरण करण्यातआले.
- *वर्ल्ड लीडर्स डिजिटल डिटॉक्स बेस्ट प्रॅक्टिसेस या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
:* डिजिटल उपकरणे वापरताना करावयाचे योग्य  व्यवस्थापन  याविषयी  विविध जागतिक नेत्यांकडून अनुसरली जाणारी सर्वोत्तम पद्धती दर्शविणारे सर्वसमावेशक मार्गदर्शक पुस्तक.
- * ‘5000 वुमन ऑफ वेलनेस’ या पुस्तकाच्या मुख पृष्ठाचे अनावरण करण्यात आले.
* यामध्ये सर्वांगीण जीवनाला  चालना देण्यासाठी महिलांची भूमिका ओळखणे आणि प्रोत्साहन देणे याविषयी चर्चा करण्यात आली आहे.

जागतिक नेत्यांचे आवाहन:
प्रतेकानी आपल्या सार्वजनिक जीवनात डिजिटल डीटोक्स  डेला महत्व देऊन त्याबद्दल जाणीव जागृती करण्याचे आवाहन  न्यूयॉर्क, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि इतर अनेक देशांतील प्रमुख नेत्यांनी केले आहे. डिजिटल डिटॉक्स ही ज्वलंत समस्या तिचे स्वरूप जागतिक आहे.त्यामुळे या समस्येला प्रामुख्याने जागतिक संकट मानून सामुहिकपणे तोंड देण्याची गरज आहे असे प्रतिपादन या सर्वच नेत्यांनी केले आहे.
 मीडिया चौकशीसाठी, 
कृपया संपर्क साधा: rekhaglobalwellness@gmail.com
डॉ. रेखा चौधरी
ग्लोबल वेलनेस,राजदूत, भारत
संस्थापक –वर्ल्ड डिजिटल डीटोक्स डे 
www.worlddigitaldetoxday.com
A Growing Revolution- Offline is the New Luxury
(एक नवीन क्रांती-ऑफलाईनच आहे भारी)