वैजापूर-लोक न्यूज
पैठण चे संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या धर्मपत्नी वैजापूरच्या होत,संत एकनाथ महाराजांचा वाङ्:निश्चय
(म्हणजे साखरपुडा) ज्या एकट्या विठोबाच्या मंदिराबाहेरील ओट्यावर झाला त्या एकटा विठोबा मंदिराचे भाग्य उजाडले ,कार्तिकी एकादशी गुरुवार(ता,२३)रोजी या मंदिराच्या नविन सभागृह बांधकामाचे भूमिपूजन सोहळा वैजापूर-गंगापूरचे आ,रमेश पा,बोरनारे यांच्या हस्ते आज सकाळी ९-००वाजता संपन्न झाले,आ,बोरनारे यांनी आपल्या निधी फंडातून चाळीस लक्ष रुपये निधी या सभामंडप साठी दिला आहे,ही वास्तू बाराशे ते तेराशे वर्षांपूर्वी ची
आहे, वास्तूचे व ओट्याचे अस्तित्व जसेच्या तसे ठेऊन
हे बांधकाम करण्यात येणार आहे,प्रभाग क्र,३व प्रभाग क्र,४ अंतर्गत महाराणा प्रताप रोडलगत हे मंदिर आहे,नगरसेवक स्वप्नील जेजुरकर व डॉ,निलेश भाटिया याचे हे प्रभाग आहेत,या प्रसंगी विधिवत पूजा होऊन आ,बोरनारे यांनी पांच कुदळ खोदल्या, व ईतर उपस्थिनानीही कुदळ लावली या प्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप ,तालुका प्रमुख राजेंद्र पा, साळुंके,शहर प्रमुख पारस घाटे,खुशालसिंह राजपूत,गोटूसिंह राजपूत,दशरथ बनकर,अनिता तांबे,उल्हास ठोंबरे,सुरेश तांबे,पी,जी,पवार,या मंदिराचे पुजारी श्रीमती कल्पना अकोलकर,चंद्रकांत अकोलकर,साक्षी अकोलकर,नानु जोशी,ठा,धोंडीरामसिंह राजपूत,विष्णू जेजुरकर,कुमोद
जेजुरकर,पंकज ठोंबरे,शशिकांत भालेराव,दिनेश वैष्णव,दीपक साकला,सागर संचेती,महेश बुणगे, प्रकाश पाटील,शंकर जोरे,कैलास साखरे, काशिनाथ
भावसार,गोविंद दाभाडे,प्रकाश माळी, दौलत गायकवाड, जवाहर कोठारी, तसेच सुधीर जोशी, ज्योती जोशी,सौ,लक्ष्मी जेजुरकर,
शांतीलाल संचेती,ऍड रामकृष्ण बोडखे, भगवान राजपूत ,संदीप बोर्डे,यांची उपस्थिती होती,मुंजोबा मित्र मंडळ व जेजुरकर परिवार यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला,सूत्र संचलन धोंडीराम राजपूत यांनी केले आभार स्वप्नील जेजुरकर यांनी मानले,
