अमळनेर (लोक न्यूज )
आज देशालाच नव्हे तर जगाला महात्मा गांधींच्या विचारांचं आकर्षण असून द्वेषाने द्वेष च वाढतो,गांधींच्या ऐवजी जर गोडसे च्या प्रतिमांची मिरवणूक काढली जाते यापेक्षा दुर्दैव काय ? असा संसप्त सवाल गांधी - शास्त्री जयंतीच्या निमित्ताने सेवा दल काँग्रेस च्या बन्सीलाल  भागवत गुरुजी यांनी केला. शहरातील प्रमुख राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अल्लामा फज़ले हक़ खैराबादी ग्रंथालयाच्या मौलाना रियाज शेख यांनी  गांधी शास्त्री संयुक्त जयंतीचा कार्यक्रम साजरा केला. जयंती कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी असलेल्या भागवत गुरुजी यांनी छोटखानी भाषणातून गांधी आणि शास्त्री यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रा सुभाष (जीभाऊ) पाटील,सुभाष अण्णा चौधरी, धनगर अण्णा पाटील,प्रा. के डी पाटील सर, सुलोचना वाघ, वसुंधरा लांडगे यांनी आपले विचार मांडले.त्यांनी आपल्या भाषणातून
महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांपैकी एक होते. किंबहुना, त्यांनीच ब्रिटिश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या यशस्वी मोहिमेचे नेतृत्व केले. गांधी हे कायद्याचे विद्यार्थी होते, परंतु त्यांनी आपला व्यवसाय सोडला आणि आपल्या राष्ट्रासाठी लढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मते, “डोळ्याच्या बदल्यात डोळा संपूर्ण जगाला आंधळा बनवेल.” त्यांनी अहिंसेचे पालन केले आणि हिंसा हे प्रत्येक गोष्टीचे उत्तर नाही असा त्यांचा विश्वास होता. असे विचार मांडलेत.
           “तुम्ही जगात पाहू इच्छित असा बदल व्हा” आणि त्याने आपल्या जीवनात तेच केले. तो बदल होता. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अथक लढा दिला आणि प्रसंगी आपले जीवन पणाला लावले. त्यांनी अनेक चळवळींचे नेतृत्व केले ज्यामुळे त्यांना अनेक वेळा अटक झाली,असंख्य हाल सहन करून ब्रिटिशांच्या जुलुमी राजवटीच्या विरोधात जाऊन देशाला स्वातंत्र्य मुळवून देण्यास मोलाची भूमिका बजावली.
          प्रतिमा पूजन आणि भाषणे झाल्यावर सर्व मान्यवरांनी स्वछता अभियानात सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गौतम मोरे यांनी केले.
प्रसंगी  सुरेश पाटील मार्केट उपसभापती, प्रा सुभाष पाटील मार्केट संचालक, मनोज पाटील शहराध्यक्ष काँग्रेस अमळनेर, धनगर पाटील माजी सभापती प स अमळनेर, सुलोचना वाघ जिल्हाध्यक्ष महिला काँग्रेस, रवी मोरे संपादक दर्पण, गौतम मोरे समाजिक कार्यकर्ते, प्रा नयना पाटील शहराध्यक्ष महिला काँग्रेस अमळनेर, ऍड. तिलोत्तमा पाटील (सामाजिक कार्यकर्त्या) वसुंधरा लांडगे (संचालक अर्बन बँक,) ऍड हेमंत भांडारकर, संतोष पाटील (सामाजिक कार्यकर्ते), महेश पाटील (पाडळसरे धरण समिती), योगेश देसले (समाजिक कार्यकर्ते माजी नगर सेवक) मुकतार खाटीक,नीळकंट दादा, इमरान खाटीक,पन्नालाल मावळे, रहीम मिस्तरी, इकबाल शेख साहाब,हाजी ताहेर शेख,जहुर मुतवल्ली,हाजी के बी शेख साहाब,पप्पू खाटीक, अ.कादीर,राजू शेख,लियाकत,अ.वाहेद,नवाज़,आदि मान्यवर उपस्थित होते