लोक न्यूज-
अमळनेर ते श्री क्षेत्र कपिलेश्वर पायीवारीचे श्री साई गजानन मंडळाकडून आयोजन २८० भाविक झाले सामील* ४ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीक्षेत्र अमळनेर ते श्रीक्षेत्र कपिलेश्वर पायीवारीचे आयोजन  श्री साई गजानन सेवा मंडळ अमळनेर च्या वतीने करण्यात आले होते. अमळनेर ते कपिलेश्वर पायीवारी ४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेपाच वाजता मोठे बाबा मंदिरावर शिवाजीराव मोहन पाटील यांच्या हस्ते आरती होऊन समाईक महापूजा करण्यात आली गण गण गणात बोते।। मंत्र जप करत  वारीचे प्रस्थान करण्यात आले. मोठेबाबा मंदिर आवारात प्रा आर व्ही पाटील यांच्यावतीने वारकऱ्यांना सकाळचा दूधचहा देण्यात आला टाळ मृदंगाच्या गजरात सकाळी वारीचे प्रस्थान झाले वारीत सुमारे 280 वारकरी सामील झाले होते .ओम नमः शिवाय मंत्र जपत, वारकऱ्यांना  श्रीराम मंदिराजवळ जितेंद्र रमेश बोरसे यांनी भाविकांसाठी राजगिरा लाडू चे वाटप केले . वारीचे प्रमुख श्री शिवाजीराव मोहन पाटील व मंडळांचे विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार शिस्तबद्ध पद्धतीने वारी धार या गावी पोहोचली त्या ठिकाणी श्री शशिकांत पाटील , सरपंच सैनदाने सर यांनी वारकऱ्यांसाठी उपासाची खिचडी व केळी प्रसाद वाटप केले. वारीप्रमुख शिवाजी मोहन पाटील तसेच विठ्ठल पाटील,शिरीष डहाळे सर,   यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार धार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला. पायीवारीत सडावन , चाकवे, धार येथील भाविक सामील झाले होते. पालखीचे गावात मिरवणूक काढून घरोघरी आरत्या करण्यात आल्या. एस एम आप्पांनी व  डहाळे सरांनी यांनी मुस्लिम बांधवांचा देखील त्या ठिकाणी सन्मान केला व जातीय सलोखा वाढवण्यासाठी शुभेच्छा दिल्यात. पुढे वारीला धानोरा फाट्यावर नितीन नीलकंठ पाटील व दीपक पाटील यांनी खजूर प्रसाद वाटप केला. मारवाड गावी भैरवनाथ मंदिरावर पोहोचली ओम नमः शिवाय चा जप करत वारकरी विसावले या ठिकाणी ग्रामविकास अधिकारी मुकेश साळुंखे व सुनीलभाऊ मुंदडे यांनी वारकऱ्यांसाठी साबुदाणा खिचडी फराळाचे व्यवस्था केलेली होती त्या ठिकाणी देखील वारी प्रमुखांसह मंडळाचे पदाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला गोवर्धन संस्थांचे अध्यक्ष श्री निंबा पाटील, श्री सुनील भाऊ मुंदडे व मुकेश साळुंखे यांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला मोतीलाल कुंभार यांनी चहाची व्यवस्था केली होती वारकऱ्यांनी चहा घेऊन, कळमसरे शिवजवळ किशोर चौधरी यांनी चक्की पाकीटचे वाटप वारकऱ्यांना केले. कळमसरे गावाजवळ वारी पोहोचतात अनेक महिला भगिनींनी पूजेसाठी पुढे येऊन पूजा केली. पुढे ओम नमः शिवाय चा जयघोष करत पालखी शिवमंदिराच्या  प्रारंगात दाखल झाली त्या ठिकाणी पिंटू भाऊ राजपूत यांनी वारकऱ्यांसाठी केळी प्रसाद व उपास चिवडा फराळ म्हणून दिला तर भिकेसिंग जतन सिंग राजपूत ,प्रदीपसिंग राजपुत, दरबारशिंग राजपूत यांचा व सेवा देणारे भाविक यांचा मंडळाचे सदस्य व वारी प्रमुखांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.आरती होऊन वारकरी पालखीघेऊन नाचत आनंद घेत वाजत गाजत  निघाले. पुढे सडावणकर रमाकांत नामदेव पा  सपत्नीक खास करून वारीसाठी दाखल झालेले होते. निम गावी छोटु गयभु पाटील यांनी सरबत सेवा दिली .वारीत सुमारे 280 महिला भगिनी-पुरुष  दाखल झाल्या होत्या वारी कपिलेश्वर तीर्थाच्या जवळ पोहोचल्यानंतर सी एस पाटील व मगन भाऊसाहेब हे वारीस मानवंदना देण्यासाठी पुढे आलेत वारी प्रमुख  एस एम आप्पा ,विठ्ठल पाटील,डहाळे सर  यांना पुढे करत वारी श्री क्षेत्र कपिलेश्वर येथे पोहोचले तेथे भजन सेवा सत्संग करण्यात आला त्या ठिकाणी कपिलेश्वर संस्थांच्या वतीने श्री शिवाजीराव मोहनराव पाटील यांना वारीप्रमुख म्हणून मानाचे नारळ देऊन सत्कार केला, त्यासोबत शाल श्रीफळ देऊन  महामंडलेश्वर हंसानंदाजी तीर्थराज महाराज व ट्रस्टचे सी एस पाटील सर , मगन भाऊसाहेब, यांच्या हस्ते त्यांना सन्मानित केले, महाराजांच्या हस्ते मंडळाच्या प्रमुख कार्यकर्ते यांना ही श्री फळ देण्यात येऊन त्यांना महाराजांनी आशिर्वाद दिले. पायीवारी वारकऱ्यांना कपिलेश्वर संस्थेकडून महाप्रसाद सेवा दिली वारीत धार , मारवड, कळमसरे, सडावन,नेरपाट, चाकवे येथील महिलांना ग्रुप नुसार सन्मानित करण्यात आले. पायवारीसाठी जे पुरुष वारकरी आले होते त्यांना देखील ग्रुप वाईज सन्मानित करण्यात आलं.  आले.धुडकू महाराज यांनी पाणी जार सेवा उपलब्ध केली.उमेश भाऊ साळुंखे सरपंच  यांनी पाणी गाडी सेवा दिली. सडावण येथिल नामदेव बापू, गुलाब मुरलीधर पाटील, चाकवे येथील सुखदेव पाटील ,पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष अंकुश पाटील, समाधान पाटील शनि महाराज ,तुळशीराम व्यंकट पाटील ईश्वर पाटील, यांनी मोलाचे सहकार्य केले श्री साई गजानन मंडळाचे विठ्ठल पाटील ,रमेश सैंदाणे, लक्ष्मण दादा निकम , गुणवंत पवार  ,डहाळे सर रमेश विठ्ठल पाटील, दिलीप खैरनार सर ,योगेश बाग ,आर एच पाटील, वाल्मिक मराठे, अशोक इसे, राजेंद्र सोनवणे ,सुरेश धनगर ,कांतीलाल पाटील, मुकेश साळुंखे, चेतन पाटील ,गणेश बोडरे, सुभाष साळुंखे डी ई पाटील, योगेश पा शहापूर यांनी परिश्रम घेतले सर्वांचे मंडळाचे अध्यक्ष एस एम पाटील व सचिव विठ्ठल पाटील,शिरीष डहाळे सर यांनी आभार मानले अनेक भाविक वारीत दाखल झाले