लोक न्यूज-
वैजापूर तालुक्यातील चांडगाव येथील लष्करी सेवेतून प्रदीर्घ  सेवा बजावून निवृत्त सैनिक शिवनाथ पा,राहणे यांची कन्या डॉ,अंजली शिवनाथ राहणे यांची निवड गुणवत्तेनुसार वैद्यकीय सेवेच्या पदव्युत्तर उच्च  शैक्षणिक पात्रतेसाठी छत्रपती संभाजीनगर च्या वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच झाली आहे, डॉ,अंजली राहणे वैजापूर येथील स्व,बाळासाहेब ठाकरे आपले रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवारत आहेत,त्यांनी एम,बी,बी,एस ची पदवी उच्च श्रेणी सह आंबेजोगाई येथील शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून प्राप्त केलेली आहे,तिच्या या निवडीबद्धल आ,रमेश पा,बोरनारे व  सामाजिक कार्यकर्ते तथा स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत, प्रशासक तथा मुख्याधिकारी भागवत बिघोत व वैद्यकीय अधिकारी डॉ,सविता निकाळे यांनी अभिनंदन केले आहे.