लोक न्यूज-
संपूर्ण राज्यात राजस्व अभियान अंतर्गत "महसूल सप्ताह"१ऑगस्ट ते७ऑगस्ट पर्यँत  सुरू झालेला आहे,या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत ,याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली येथील नगर परिषद व महसूल विभागाच्या  संयुक्त विद्यमाने  गुरुवार(ता,०३) रोजी "माझी वसुंधरा अभियान"  व महसूल विभाग च्या वतीने पालिकेच्या व्यंकटेशनगर येथील तारेचे कुंपण लावलेल्या जागेवर पांचशे रोपट्यांची लागवड करण्यात आली, आय,पी, एस, पोलीस अधिकारी महक स्वामी,उपविभागीय दंडाधिकारी तथा
उपजिल्हाधिकारी डॉ, अरुण जऱ्हाड, तहसीलदार सुनील सावंत,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान,मुख्याधिकारी तथा पालिका प्रशासक भागवत बिघोत, माजी नगरसेवक दशरथ बनकर,गणेश खैरे,डॉ,प्रीती भोपळे, माजी शिक्षणाधिकारी धोंडीरामसिंह राजपूत ,यांच्या हस्ते पांचशे रोपटी लावण्यात येऊन ती जगविण्याचा संकल्प ही सोडण्यात आला,जिल्हाधिकारी अस्तिकुमार पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या आठवड्यात दहा हजारांवर झाडे  पालिकेच्या जागेवर लावली ,आणखी पालिकेच्या जागेवर चाळीस हजार रोपटी लावणार असल्याचे मुख्याधिकारी बिघोत यांनी सांगितले, या प्रसंगी  अभियंता सुरेश चिमटे,भांडारपाल वाल्मिक शेटे,चेतन निखाडे,प्रमोद निकाळे, शांताराम मगर,जितेंद्र चापानेरकर,संतोष जाधव , वैजापूर तलाठी एस ,पी,जाधव यांच्या सहं पालिका व महसूल विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.