नुकत्याच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव नोंदविलेल्या तनय रितेश चौधरी याने १५ ऑगस्ट २३ रोजी आयोजित स्केटिंग रिले मॅरेथॉन २०२३ स्पर्धेत भाग घेऊन ३ जागतिक विक्रम (आशिया पॅसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्डस् आणि एक्सट्रीम रेकॉर्ड )आपल्या नावावर केले आहे.
बदलापुरात ११० स्केटिंग खेळाडूंनी ५ तास स्केटिंग करून आशिया बुक मध्ये नाव नोंदवले. १५ ऑगस्ट २०२३, स्वतंत्र दिवसाच्या निमित्त, इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग या संघाने हा विश्व विक्रमाचे आयोजन केले. वय वर्ष ३ ते ३० या वयोगातील खेळाडूंनी ही कामगिरी पार पडली. असा हा भव्य इव्हेंट बदलापूर शहरात पहिल्यांदा पार पडला.संघाने हा रेकॉर्ड आशिया पॅसिफिक रेकॉर्ड, नॅशनल रेकॉर्ड व एक्स्त्रीम रेकॉर्ड ह्याचा मध्ये नोंदवला. हा रेकॉर्ड आयएसएस स्केटिंग ट्रॅक, शिरगाव, योगी श्री अरविंद गुरुकुल, बदलापूर पूर्व येते,मुख्य प्रशिक सौ मनिषा गावकर, श्री दिपक गावकर, अथर्व गावकर, विलास चव्हाण, सानिया गावकर, अर्चना घरत, अनिकेत चव्हाण, खुशी संत्रा, वैभव खांडेकर, सुमित चव्हाण, राज पटवेकर, सागर नाईक, आकाश चव्हाण, ई या प्रशिक्षकांचा मार्गद्शनाखाली व परिश्रमाने उत्कृषटरित्या पार पडले.
इंडियन स्कूल ऑफ स्केटिंग च्या खेळाडूंनी मे महिन्यात स्वतःची गिनिस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये देखील नावे पटकावली. १९८२ साला पासून या संघाने स्केटिंग, कराटे व गिर्यारोहण शेक्ट्रात अनेक पदक मिळवले व ठाणे जिल्ह्यात सर्वकृष्ट कामगिरी केली आहे.
या कामगिरी साठी अनेक दिग्गज पाहुण्यांनी शुभेच्छा दिल्या व खेळाडूंचे मनोबळ वाढवले.
