लोक न्यूज-
तालुक्यांतील बोदर्डे येथील सौ गायत्री किशोर चौधरी यांची पोलीस पाटील परीक्षेत सर्वात जास्त गुण मिळवत तोंडी तसेच कागदपत्रे पडाळणीत सुद्धा अव्वल गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गायत्री चौधरी यांचे सासरे गुलाबराव चौधरी यांचे परीक्षा काळात अकाली निधन झाले होतें घरात दुःखाचा डोंगर असताना त्यांनी उपयुक्त असा अभ्यास करीत सासरांच्या अकराव्या दिवशी परीक्षा देत प्रथम क्रमांक पटकावला. या निवडीसाठी त्यांना बोदर्डे चे माजी सरपंच संतोष चौधरी यांचे मार्गदर्शन मिळाले यानिवडीचे स्वागत मा. आमदार शिरीष दादा चौधरी, बोदर्डे सरपंच प्रविण संदानशिव उपसरपंच नितीन पाटील ग्रामपंचायत सदस्य व संजीव पाटील प्रकाश पाटील रावसाहेब पाटील अविनाश पाटील, जितेंद्र बोरसे कैलास भिल, अशोक चौधरी, हेमराज पाटील, बापू बडगुजर, समधान चौधरी , विलास सुर्यवंशी छोटू चौधरी व ग्रामसथांनी केले..
