लोक न्यूज-
फिर्यादीत हकीकत अशी की,
 माझी आई अंजनाबाई अंकुश भिल हिचे सह पोलीस स्टेशनला हजर होवुन फिर्याद लिहून दिली की माझे पती मनोज एकनाथ भिल, सासरा एकनाथ मन्साराम भिल, सासु भिकु बाई व माझे दोन मुले असुन  रिया मनोज वय 3 वर्षे, मुलगा सोमु वय 2 वर्षे अशा परीवारासह राहत असुन माझे पती तसेच मी शेतमजुरीचे काम करते. माझे माहेर धानोरा ता. अमळनेर येथील असुन तेथे माझे वडिल-अंकुश गजमल भिल, आई अंजनाबाई अशा परीवारासह राहतात. माझे लग्नास 7 वर्षे झाले असुन मला गेले 10 ते 12 दिवसापासुन पोट दुखीचा त्रास होत असल्याने मी प्रथम तपासणी धुळे येथील गणपती पॅलेसचे समोरील असलेल्या दवाखान्यात दवाखान्याचे नाव मला आठवत नाही तेथे सोनोग्राफी तपासणी केली होती. तेव्हा मला त्या डॉक्टरांनी अपेंडिक्सचा त्रास असले बाबत सागीतले होते. त्यावरुन मी गेले तिन दिवसापासुन माझे माहेरी धानोरा येथे माझे आई वडिलाकडे आली होती. मी भिल समाजाची (एस.टी) या जातीचे प्रवर्गातील असुन डॉ. अनिल शिंदे, नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटल अमळनेर हे मराठा समाजाचे आहेत.
 दिनांक 23/08/2023 रोजी धानोरा गावातील माझे आई वडिल याचें ओळखीचे भाटपुरे नावाचे डॉक्टरांनी  मला अमळनेर येथील डॉ.अनिल शिंदे याचें दवाखान्यात जा तेथे तपासणी करुन उपचार करुन घ्या असे सागुन त्यानी मला चिट्टी करुन दिली होती. त्यावरुन मी तसेच माझे आई वडिल याचे सह अमळनेर शहरातील डॉ.अनिल शिंदे याचें नर्मदा फाउंडेशन हास्पिटल येथे आले व तपासणी करीता माझा नंबर लावला होता. माझा तपासणीचा नंबर हा दुपारी 02.00 वाजता लागला होता. तेव्हा तेथे हजर असलेले डॉक्टरांनी माझे रक्त लघवी चेक केले नंतर कंपाउडर यानीं माझी फाईल बनवुन त्यात तपासणी रिपोर्ट ठेवुन मी पुन्हा रिपोर्ट घेवुन तपासणी करीता डॉक्टरांकडे कॅबिन मध्ये दुपारी 03.30 वा. चे सुमारास गेली. तेव्हा तेथे फाईलवर फोटो असलेला डॉ. अनिल शिंदे हे होते. त्याचे सोबत एक कंपाउडर होता. व एक इसम कॅविन मधील खुर्चीवर बसलेले होते. माझे सोबत माझी आई अंजनाबाई हि होती तिस डाक्टरानीं सागीतले कि तुझे काही काम नाहीं तु बाहेर निघ असे सांगुन त्यानीं माझे आईस तपासणी कॅबिन मध्येच दुसरे बाजुला थांबवुन मला तपासणी टेबलावर झोपणेस सागुन मी टेबलावर झोपली तेव्हा नमुद डॉक्टरांनी पर्दा ओढुन मला छाती पोटावर हात लावुन तपासणी करु लागले. त्यानंतर मला त्याचे कडेस तोंड करुन बसविणेस सांगितलेवरुन मी टेबलावर बसलेली असतानां त्यानीं मला सांगितले  कि तु आता मला दोन्ही हातने मला धर असे सांगीतले असता मी त्याला दोन्ही हाताने कमरेत पकडले असता त्यानी मला तोंड वर करुन जिभ बाहेर काढणेस सागतले असता मी माझी जिभ बाहेर काढली तेव्हा त्यानी वाईट उद्देश्याने त्याचे तोंड माझे तोंडाजवळ आणुन माझी जिभ चाटु लागले असता तेव्हा मी घाबरुन त्यानां बोलली कि दादा तुम्ही असे काय करता असे बोलली असता त्यानीं त्याचे दोन्ही हातानीं माझी साडी वर कमरेपावेतो पुर्ण उचकवली व मला लज्जावाटेल असे बोलले असता मी त्यानां बोलली कि तुम्ही मला असे का करत आहात . तेव्हा मला बोलु लागले कि मी तुला तपासत आहे. असे बोलले असता मी घाबरुन माझी आईस आवाज देवुन माझे जवळ बोलविले व तिला सर्व प्रकार सागीतला असता तेव्हा आम्ही दोघेही बाहेर निघत असता ते मला बोलले कि तुझा उपचार आम्ही फुकट करु तु  झालेला प्रकार कोणाला काही सागु नको तेव्हा माझी आईने त्यास मारणे करीता हात उचलला असता हजर असलेला कंपाउडर याने माझे आईस शिवीगाळ करु नका बाहेर निघा असे बोलले त्या नंतर आम्ही दवाखान्याचे बाहेर आलो. बाहेरच माझे वडिल हे माझे लहान मुलाजवळ थांबलेले होते. त्यानां आम्ही देखील सदरचा प्रकार सांगितला त्यानंतर सदर ठिकाणी आमचे समाजाचे लोक आले होते. व या वेळी दवाखान्यातुनच माझे आईसह पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यास घेऊन गेले.
 डॉ. अनिल शिंदे, नर्मदा फाउंडेशन हॉस्पिटल,अमळनेर यांच्या विरुध्द अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद नोंद करण्यात आली आहे.

डॉ.अनिल शिंदे यांच्या विरोधात विनयभंगासह इतर गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास DYSP सुनिल नंदवाळकर करीत आहेत.