लोक न्यूज-
मौजे ढेकू खुर्द, ता. अमळनेर, जि. जळगाव च्या ग्रामपंचायतीचे सदस्य यांनी अमळनेर तहसीलदार यांच्या कडे दि.21-8-2023 रोजी उपसंरपच श्री. रविंद्र शिवाजी पाटील यांच्या विरुध्द पंचायतीच्या सभेत सात सदस्यांनी अविश्वासाचा ठराव केला असून सदरच्या अविश्वास प्रस्तावात नमुद मुद्यावर चर्चा व मतदान करणेकामी मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 35(2) अन्वेय ग्रामपंचायतीचे सर्व सदस्यांची विशेष सभा दि.25-8-2023 रोजी सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत ढेकू खु.येथे आयोजित करण्यात आलेली आहे.
या सदस्यांनी केला अविश्वास ठराव...
१) श्री. नथ्यु गुणवंत सोनवणे
२) सौ. सुधा प्रदिप सोनवणे
३)सौ. योगिता विनोद पाटील
४) सौ. निता विश्वास पाटील
५)सौ. वैशाली नथ्यु सोनवणे
६) श्री. संजय भिकारी मैराळे
७) सौ. आशाबाई गोंविदा पाटील
अविश्वास ठरावाचे मुद्दे....
१) सरपंच हे अशिक्षित असल्यामुळे त्याच्या गैरफायदा घेवुन ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करतात सरपंचाच्या कामास हस्तक्षेप करतात.
२) मासिक सभेमध्ये विषयावर चर्चा न करता ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर कामे करतात ठरावाप्रमाणे वागत नाही.
३) मनमानी कारभार करतात
वर नमुद केलेली वस्तुस्थिती आमच्या संपुर्ण माहितीप्रमाणे खरी असल्याचे आम्ही जाहीर करतो. असे अविश्वास ठरावात म्हटले आहे.
