लोक न्यूज-
दिनांक 23/08/2023 रोजी दुपारी 04.30वा. चे सुमारास नर्मदा मेडीकल फाऊंडेशन अमळनेर येथे डॉ. अनिल शिंदे यांचे कॅबीनमध्ये पेशंट ममता मनोज भिल, तिची आई, वडील व त्यांच्या सोबत गुलाब बोरसे हिंगोणेकर, नरेश रतिलाल भिल रा. अमळनेर, रवि वाघ व त्याचे सोबत ' 10 ते 15 लोक अशांनी आमचेवर मोफत् उपचार करावेत तसेच आम्ही दिलेले पैसे परत करावेत तसेच आम्हांला आताच्या आता 10 हजार रुपये रोख द्यावेत जर पैसे दिले नाहीत तर आम्ही तुमच्यावर खोटा ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल करु व तुम्हांला जिवे ठार मारु अशी धमकी देवून त्याच्य मागणीला नकार दिल्याने डॉक्टरांच्या टेबलमधील ड्रॉवरमध्ये ठेवलेले पैसे जबरदस्तीने काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर बी. पी. ऑपरेटरचा लोखंडी स्टॅन्ड उचलून डॉक्टरांच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला व संतापाच्या भरात लोखंडी खुर्ची उचलून पेशंटच्या ड्रेसींग टेबलचा काचेची तोडफोड केली म्हणून ममता मनोज भिल, तिची आई, वडील व त्यांच्या सोबत गुलाब बोरसे हिंगोणेकर, नरेश रतिलाल भिल रा. अमळनेर,रवि वाघ व त्याचे सोबत 10 ते 15 लोक अशांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि अनिल भुसारे करीत आहे.
