लोक न्यूज-
अमळनेर.  शाळेतील इ. 10 वी मार्च 2023 शाळेतून 119 विद्यार्थिनी परीक्षेसाठी प्रविष्ट झाल्या होत्या त्यापैकी 118 उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल 99.15% लागला त्यात 10 विद्यार्थिनी 90% पेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झाल्या असुन, 
प्रथम- वैद्य मौर्विका मिलिंद -   97.00 %
द्वितीय- पाटील सई विलास- 96.20%
तृतीय- पाटील चेतना प्रविण - 95.00%
चतुर्थ- पाटील आदिती अंकुश - 94.60%
पाचवी- येवले मयुरी गणेश - 93.00%
 तसेच *63* विद्यार्थिनी *डिस्टिंक्शन* तसेच जवळ जवळ सर्वच विद्यार्थिनी प्रथम वर्गात पास झाल्या आहेत. संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळालेल्या विद्यार्थिनी -
1) पाटील सई विलास 
2) येवले मयुरी गणेश 

सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थेचे संस्थापक मा. आ. साथी. श्री. बापूसो. गुलाबराव वामनराव पाटील, अध्यक्ष मा. श्री. आबासो. हेमकांत पाटील, सचिव मा. श्री. दादासो. संदीप घोरपडे सर , शालेय समिती अध्यक्ष अॅड. श्री. नानासो. अशोक बावीस्कर व सर्व संचालक मंडळ यांनी व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती. अनिता बोरसे मॅडम आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. 
शाळेने तालुक्यातून सर्व प्रथम येण्याचा व शाळेचा निकाल सर्वात जास्त राहण्याची परंपरा कायम ठेवली.