वैजापूर- लोक न्यूज
भारत सरकारच्या "मेरी लाईफ मेरा स्वच्छ शहर"या अभिनव अभियाना अंतर्गत आर,आर,आर,सेंटर (रेड्यूस, रियुज,रिसायकल) या केंद्राचा उदघाटन समारंभ माजी शिक्षणाधिकारी तथा पालिका स्वच्छतादूत धोंडीरामसिंह राजपूत यांच्या हस्ते सोमवार(ता,२२)रोजी येथील पालिकेच्या स्वच्छता निरीक्षक कार्यालयात झाला ,याप्रसंगी नोडल अधिकारी एम,एच,मोदाणी,स्वच्छता निरीक्षक प्रमोद निकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती ,पालिकेचे प्रशासक भागवत बिघोत(राजपूत) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या केंद्रात जुन्या वस्तू, जुनी भांडी,जुनी पुस्तके,जुने कपडे,जुने चप्पल बूट,इलेक्ट्रॉनिक वस्तू, इत्यादी वापरण्या योग्य वस्तू शहरातील नागरिकांनी आणून द्याव्यात असे आवाहन धोंडीराम राजपूत यांनी शहर वासीयांना केले आणि ज्या गोरगरीब गरजूना ह्यातील वस्तू त्यांनी घेऊन जाव्यात यामुळे गोरगरीब गरजुची गरज पूर्ण होईल
असे राजपूत उदघाटन प्रसंगी म्हणाले,यातिल एक कोपरा "माणुसकीचे घर "नावाने ठेवला आहे,तर दुसरा कोपरा रेड्यूस,रियुज,रिसायकल असा आहे, यात ही चांगल्या प्लास्टिक व इतर वस्तू जमा करतात,लाईफ स्टाईल फॉर एनव्हरमेंट असे लिहिलेले आहे, या उपक्रमात लोकांचा सहभाग महत्वाचा आहे,"माझे शहंर -स्वच्छ शहंर,सुंदर शहर, निरोगी शहर ,वैजापूर शहर,"असे घोषणा राजपूत यांनी दिली याप्रसंगी सहायक रमेश त्रिभुवन, कैलास त्रिभुवन, प्रथमेश त्रिभुवन,अजय त्रिभुवन व नागरिक उपस्थित होते.
