वैजापूर-लोक न्यूज
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त व हिंदू सूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंती
निमित्त रविवार(ता,२८)रोजी आधार जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीने  शहरातील जेष्ठ नागरिकांनी संत तुकाराम महाराज सभागृहात एकत्र येत  अभिवादन 
केले, आरंभी जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी व जेष्ठ नागरिक रवींद्र साखरे यांनी अनुक्रमे वि,दा,सावरकर व महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले,जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी या दोन्ही महापुरुषांच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकून जेष्ठ नागरिकांना अशा महापुरुषाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून आपल्या परिवारातील छोट्या मुलांवर राष्ट्रीय ,सामाजिक,नैतिक संस्कार करून राष्ट्रीय मूल्ये बिंबविण्याचे आवाहन केले,प्रार्थना व प्रसातविक जेष्ठ नागरिक उत्तमराव साळुंके यांनी केले,आभार आधार जेष्ठ संघ चे अध्यक्ष 
अण्णा साहेब शेळके यांनी मानले,याप्रसंगी ज्या जेष्ठ नागरिकांचे या महिन्यात वाढदिवस आहेत त्यांचा शाल व गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन करण्यात आले या प्रसंगी  जेष्ठ नागरिक सोन्याबापू गावडे,दगु वाणी,साहेबराव साळुंके, कृष्णा काबळे,प्रेमसिंह राजपूत,काळे मामा,पोपट भोसले,वैजीनाथ मिटकरी, सचिन सूरजमल राजपूत,डी,आर,धामणे,श्री शेळके यांच्या सह जेष्ठ नागरिक उपस्थित होते.