लोक न्यूज-
अमळनेर : कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती,धुळे  तसेच अमळनेर तालुका क्रीडा समिती,अमळनेर
यांच्या  संयुक्त विद्यमाने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जन्मोत्सव निमित्ताने राज्यस्तरीय गुण गौरव सोहळा अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी   माजी आमदार शिरीष  चौधरी होते. 
 प्रमुख अतिथी म्हणून माजी  आमदार स्मिता वाघ , खान्देश शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी पोलीस निरीक्षक विजय शिंदे, अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,मेजर राजेंद्र श्याम यादव,  महेंद्र सुदाम महाजन,धार सरपंच दगडू सैंदाणे हजर होते.
तसेच अवघ्या काही महिन्यात तीन गुन्हेगारांवर एम पी डी ए  कारवाई करणारे व अवघड गुन्ह्याचे डिटेक्शन करून देशातील सराईत गुन्हेगारांना अटक केल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय शिंदे  यांचा विशेष स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 या पुरस्कार सोहळ्याचे  संयोजन कला व क्रीडा शिक्षक समन्वय समिती,धुळे संस्थापक अध्यक्ष हेमंत भदाणे,सचिव राहुल एच.पाटील,उपाध्यक्ष वासुदेव शेलकर,अमळनेर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष सुनील वाघ,कार्याध्यक्ष संजय पाटील,निलेश विसपुते,अतुल बोरसे,बापूराव सांगोरे,एन.एल.पाटील, आर.टी.बागुल,आनंद धनगर, यांनी केले.सूत्रसंचालन व आभार सुनिल पी. वाघ यांनी मानले.