लोक न्यूज-
अमळनेर येथील कृषी उत्पन्न बाजार - समितीत जनतेच्या आशीर्वादाने मी सभापती असताना मार्केटचे जे वैभव होते तेच गतवैभव आपण सहकार पॅनलच्या माध्यमातून विराजमान होणाऱ्या संचालक मंडळाद्वारे परत आणू अशी ग्वाही महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलच्या मेळाव्यात आ. अनिल भाईदास पाटील यांनी जाहीरपणे दिली.अमळनेर येथील अंबिका मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आ. अनिल पाटील तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, जि. प. सदस्या सौ. जयश्री पाटील, जेष्ठ नेत्या सौ. तिलोत्तमा पाटील उपस्थित होते. सुरवातीला बळीराजा पूजन होऊन प्रास्ताविक रामकृष्ण पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना आ. पाटील म्हणाले की आमचा कोणताही उमेदवार अवैध धंदे करणारा नाही, कोणताही उमेदवार ५ हजार घेऊन मार्केटचे टोकन विकणारा नाही, कुणाच्या विश्वासाला तडा जाणार नाही हा आमचा शब्द असून, भविष्यात कुणी टोकन विकलेच तर मी स्वतः त्याला संपविल्याशिवाय राहणार नाही. शेतकऱ्यांना जास्तीतजास्त भाव कसा मिळेल याचे नियोजन व प्रयत्न संचालक मंडळाने करणे अपेक्षित असते, गेल्या काळात मार्केटला टोकन घोटाळा झाला तेव्हा शेतकऱ्यांचे हाल काय झाले ते आपण अनुभवले आहेत. ५ हजार मध्ये टोकन विकून ज्यांनी शेतकऱ्यांशी गद्दारी केली त्यांना जोडे हाणले पाहिजे, मार्केटमध्ये आपल्याच नातलगांना किती दुकाने विकलीत तेही प्रश्न विचारले पाहिजेत. आमचे संचालक मंडळ विराजमान झाल्यास कोणाचीही कट्टी कापली जाणार नाही ही ग्वाही आहे असे सांगत संपूर्ण सहकार पॅनल विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी मंचावर....
तालुका प्रमुख श्रीकांत पाटील, विजू मास्तर, मुन्ना शर्मा, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष सौ. सुलोचना वाघ, ग्रंथालय सेलच्या प्रदेश सरचिटणीस सौ. रिता बाविस्कर, प्रा. सौ. मंदाकिनी भामरे, जयवंतराव पाटील, संदीप घोरपडे, शिवसेना बी. के. सूर्यवंशी, श्याम पाटील, संजय पूनाजी पाटील तसेच पॅनलचे उमेदवार भोजमल मालजी पाटील, कृषिभूषण सुरेश पिरन पाटील, दिपक मणीलाल पाटील, अशोक आधार पाटील, प्रा. सुभाष सुकलाल पाटील, गोकुळ बोरसे, समाधान धनगर, सौ. सुषमा वासुदेव पाटील (देसले), सौ. पुष्पा विजय पाटील, डॉ. अनिल शिंदे, सचिन बाळू पाटील, प्रा. सुरेश विक्रम पाटील, भाईदास सोनू भिल, रामकृष्ण अभिमन पाटील, महादू आना पाटील उपस्थित होते. मेळाव्यास प्रचंड मोठा प्रतिसाद लाभला, सूत्रसंचालन मनोज पाटील तर आभार प्रा. सुभाष पाटील यांनी मानले.


